सिद्धांत इस्सर हिंदी चित्रपट 'लास्ट डील' द्वारे पर्दापण करत आहे.

 पुनीत इस्सर यांचा पुत्र सिद्धांत इस्सर हिंदी चित्रपट 'लास्ट डील'  द्वारे पर्दापण करत आहे.

चित्रपटांच्या ऑफिशियल घोषणेच्या फंक्शन मध्ये गणेश आचार्या सोबत अनेक सेलिब्रिटीं सहभागी झाले 

महाभारत मधून दुर्योधन बनुन नावलौकिक मिळविणारे फिट आणि फाइन अभिनेता-दिग्दर्शक पुनीत इस्सर ने काही सिनेमांतुन वेगवेगळे रोल उत्कृष्टपणे साकारले आहेत. सलमान खान अभिनीत सिनेमा 'गर्व' चे दिग्दर्शन देखील त्यांनी केले होते. आता पुनीत इस्सर यांचा पुत्र सिद्धांत इस्सर हिंदी चित्रपट 'लास्ट डील' द्वारे बॉलीवुड मध्ये आपल्या अभिनय कैरियरची सुरूआत करत आहे. मुंबई स्थित रहेजा क्लासिक क्लब मध्ये हया सिनेमांची  ऑफिशियल घोषणा केली गेली, तेव्हा सिद्धांतला आशीर्वाद देण्यासाठी त्याचे पिता सोबत अनेक सेलिब्रिटीं सहभागी  झाले होते. त्यामध्ये सुप्रसिद्ध कोरियोग्राफर व डायरेक्टर गणेश आचार्या, कॉमेडियन एहसान कुरैशी, गूफी पेंटल, पवन कौशिक, ब्राइट चे योगेश लखानी पाहुणे म्हणून उपस्थित होते. पुनीत इस्सर ने क्लैप देऊन ह्यांची ऑफिशियल सुरुवात केली. 
ह्या क्राईम थ्रिलर हिंदी सिनेमाचे दिग्दर्शक राजेश के राठी आहेत. ह्या सिनेमात सिद्धांत इस्सर सोबत प्रीति चौधरी, सुपर्णा माला कर, अमित पचौरी झळकणार आहे.
श्री गहभाम प्रोडक्शनस व एवीए फिल्म्स ऐंड एंटरटेनमेंटच्या बैनर खाली निर्मित ह्या सिनेमाचे पाच निर्माता आहेत अर्जुन सिंह, रवि सिंह, ब्रजेश कुमार राजपूत (बॉबी), राकेश यादव व मनोज कुमार. सिनेमाचे सह निर्माता आहेत जेवियर एंथोनी सलदंहा (रूठ फिल्म्स) व अनु जैन. लवकरच ह्या सिनेमाची शूटिंग सुरू होणार आहे. जानेवरी 2020 मध्ये रिलीज़ करणार आहे. कॉमेडियन एहसान कुरैशी म्हणाले कि चित्रपटाशी संबंधित संपूर्ण टीमचे अभिनंदन. एक सिनेमा बनविताना 90 लोकांचे घर चालते. त्यांनी येथील लोकांना हसविले देखील.
सिनेमाचे दिग्दर्शक राजेश के राठी ने सांगितले कि ह्या सिनेमात 3 गाणी आहेत, जी सिचुएशनल सोंग आहेत  कथेला बरोबर घेऊन जाते."
सिद्धांत इस्सर च्या सिलेक्शन विषयी दिग्दर्शक राजेश के राठी ने मीडियाला सांगितले कि कैरेक्टरला मिळता जुळता  चेहरा भेटल्यामुळे कथा रूचकर पणे सांगता येते. सिद्धांत चे फोटो पाहून व त्याला भेटून मला वाटले कि हया रोल साठी तो परफेक्ट आहे. हा रोल फारच कठिण आहे व अनेक लेयर्स आहेत, परंतु त्यांने ते चैलेंज म्हणून स्विकारले."
सिद्धांत ने आपले पिता श्री पुनीत इस्सर यांच्या डायरेक्शन मधील एका नाटकात काम केले आहे ज्याचं नाव आहे महाभारत. ह्यात दुर्योधनचा रोल केला आहे सिद्धांत ने. दुर्योधनच्या हया लुक मुळे देखील सिद्धांतला हा सिनेमा मिळण्यास मदद झाली.
पवन कौशिक म्हणाले कि त्यांनी दिल्ली मध्ये प्ले महाभारत पाहिला आहे. सिद्धांत ने महाभारत मध्ये दुर्योधनचा रोल उत्कृष्टपणे साकरला आहे. मला आशा आहे कि लास्ट डील मध्ये तो आपली अदाकारी दाखवुन सर्वांना चकित करेन.  
हया वेळी सिद्धांत चे पिता पुनीत इस्सर ने सांगितले कि मला आनंद व गर्व वाटत आहे कि सिद्धांत ने हा सिनेमा स्वबळावर ऑडिशन देऊन मिळविला आहे आणि अशा प्रकारे हया चैलेंजिंग रोल ने तो आपली सुरुवात करण्यासाठी सज्ज झाला आहे."

Comments

Unknown said…
Yes siddhant looks confident and the script is a big hero

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर