पुलवामा अटैक मध्ये शहीद सैनिकांना ट्रिब्यूट करण्यासाठी सौमित्रा देव बर्मन ने म्यूजिक विडिओ "तू आया ना" लॉन्च केला
पुलवामा अटैक ने सर्व भारतीयांना चिंतेत टाकले होते. ह्यामध्ये काही भारतीय सैनिक शहीद झाले, हया शूर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सुप्रसिद्ध कोरियोग्राफर गणेश आचार्य यांनी एक म्यूजिक विडिओ "तू आया ना" डायरेक्टर केला आहे, जो टी सीरीज द्वारा रिलीज़ होत आहे.
काही दिवसापूर्वी मुंबईत क्लासिक रहेजा क्लब मध्ये सिंगर सौमित्रा देव बर्मन ने ह्या पहिल्या सिंगल चे भव्य- दिव्य रुपात लॉन्च केले आहे, तेथे सिंगर सौमित्रा देव बर्मन सोबत ह्या गाण्याचे गीतकार संगीतकार हैरी आनंद, विडिओ डायरेक्टर गणेश आचार्या आणि ह्या विडिओ मध्ये एक्टिंग करणारे कृष्णा अभिषेक आणि साउथची एक्ट्रेस मनविता हरीश उपस्थित होती. येथे पाहुणे म्हणून टी सीरीज चे किशन कुमार, डायरेक्टर मनोज शर्मा आणि गीतकार शब्बीर अहमद देखील उपस्थित होते.
बालपणापासूनच शास्त्रीय संगीताचे आणि गाण्याचे प्रशिक्षण घेतल्या जाणार्याे सिंगर सौमित्रा देव बर्मन ने हया प्रसंगी सांगितले कि मी खूप आनंदी आहे, उत्साहित आहे कि मला पहिल्या सिंगल मध्ये एवढ्या मोठ्या दिग्गजांसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यांनी संगीतकार हैरी आनंद, गणेश आचार्य, कृष्णा अभिषेक आणि टी सीरीज चे किशन कुमार यांचे आभार मानले.
गणेश आचार्य याप्रसंगी मीडिया बरोबर बोलताना म्हणाले कि हे फक्त एक गाणचं नाही, तर त्यात जोरदार इमोशन आहे, एक संदेश आहे. लोकांनी कृष्णाला हसविताना पाहिले आहे, मला वाटले कि तो आता लोकांना थोडे रडवेल देखील. हे सिंगल आमच्या सर्व सैनिकांना समर्पित आहे, जे आपला जीवन धोक्यात घालून सीमेवर
उभे आहेत.
साउथची एक्ट्रेस मनविता हरीश हया सिंगल द्वारे बॉलिवुड मध्ये पदार्पण करीत आहे. ती हया प्रोजेक्ट साठी खूप उत्साही आहेत, ती म्हणाली कि ती मास्टर गणेश आचार्य यांची फार मोठी फैन आहे. मी त्यांनी कोरिओग्राफ केलेल्या गाण्यांची चाहती आहे, म्हणून हया प्रोजेक्ट मध्ये काम करून मला खूप अभिमान वाटतो.
तुम्हाला सांगतो कि हया विडिओ मध्ये कृष्णा अभिषेक आणि एक्ट्रेस मनविता सोबत सिंगर सौमित्रा देव बर्मन देखील दिसणार आहे.
Comments