जीवन यशवंत आणि भाऊसाहेब शिंदे, हेमलता खडतरे यांचा 'हुंदका'

प्रख्यात लेखक-दिग्दर्शक जीवन यशवंत आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते भाऊसाहेब शिंदे 'हुंदका' या चित्रपटाद्वारे प्रथमच एकत्र येत आहेत. जीवन यशवंत दिग्दर्शित 'हुंदका' चित्रपटात भाऊसाहेब शिंदे मुख्य भूमिका साकारणार आहेत तर हेमलता खडतर नायिकेच्या भूमिकेत आहेत.

दिग्दर्शक जीवन यशवंत बॉलिवुड मधील एक प्रतिष्ठित नाव असून त्यांनी प्रख्यात दिग्दर्शक लॉरेन्स डिसोझा आणि अन्य अनेक नामवंत दिग्दर्शकांबरोबर काम केले आहे. त्यांनी आतापर्यंत १२२ हून अधिक जाहिरातींचे दिग्दर्शन केलेले आहे. त्याचबरोबर ६ मालिका आणि काही चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या असून दिग्दर्शन देखील केलेले आहे.

भाऊसाहेब शिंदे यांची ओळख मराठी चित्रपटसृष्टीसह बॉलिवुडला ही आहे. साल २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ख्वाडा’ या मराठी चित्रपटात त्यांनी आपल्या अभिनयाने सगळ्यांना प्रभावित केले होते. एवढेच नव्हे तर या चित्रपटासाठी त्यांना अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. भाऊसाहेब शिंदे यांनी "बबन" मध्ये देखील आपल्या अभिनयाने सगळ्यांना मंत्रमुग्ध केले होते.
असे हे दोन नामवंत कलाकार, उद्योजक हेमलता खडतरे द्वारा निर्मित हुंदका मध्ये एकत्र येत आहेत. तुषार गावडे यांच्या पटकथेवर आधारित या चित्रपटाचे क्रियेटीव्ह दिग्दर्शक आहेत. एन. गुलाब. सातारा आणि मुंबईच्या रमणीय लोकेशनवर ऑक्टोबरपासून नियमित चित्रिकरणाला सुरुवात केली जाणार आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर