"हुंदका" या आगामी मराठी चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते भाऊसाहेब शिंदे
प्रख्यात उद्योजिका हेमलता खडतरे यांना अभिनयाची आवड असून त्या लवकरच माई एंटरटेन्मेंट' बैनर अंतर्गत तयार होणाऱ्या "हुंदका" या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. विशेष म्हणजे "ख्वाडा" चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केलेले भाऊसाहेब शिंदे त्यांच्यासह मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. जीवन यशवंत चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून त्यानी लॉरेन्स डिसोझा आणि अन्य अनेक नामवंत दिग्दर्शकांबरोबर काम केले आहे. त्यांनी आतापर्यत १२२ हून अधिक जाहिरातींचे दिग्दर्शन केलेले आहे. त्याचबरोबर ६ मालिका आणि काही चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या असून दिग्दर्शन देखील केले आहे.
भाऊसाहेब शिंदे यांची ओळख मराठी चित्रपटसृष्टीसह बॉलिवुडला ही आहे. साल २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ख्वाडा’ या मराठी चित्रपटात त्यांनी आपल्या अभिनयाने सगळ्यांना प्रभावित केले होते. एवढेच नव्हे तर या चित्रपटासाठी त्यांना अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. भाऊसाहेब शिंदे यांनी "बबन" मध्ये देखील आपल्या अभिनयाने सगळ्यांना मंत्रमुग्ध केले होते.
असे हे दोन नामवंत कलाकार, उद्योजक हेमलता खडतरे द्वारा निर्मित हुंदका मध्ये एकत्र येत आहेत. तुषार गावडे यांच्या पटकथेवर आधारित या चित्रपटाचे क्रियेटीव्ह दिग्दर्शक आहेत एन. गुलाब. सातारा आणि मुंबईच्या रमणीय स्थानावर ऑक्टोबरपासून नियमित चित्रिकरणाला सुरुवात केली जाणार आहे.

Comments