उदगीरमध्ये भाजपाकडून अश्वजित गायकवाडांचे पारडे जड ?
उदगीर, ११ ऑगस्ट : भाजपामध्ये यंदा तरुणांना विधानसभेत मोठ्या प्रमाणात संधी दिली जाणार आहे. उदगीर विधानसभा मतदारसंघात भाजपाकडून उच्चशिक्षित युवानेते अश्वजित गायकवाड यांच्या नावाला पसंती मिळण्याची शक्यता आहे. गायकवाड यांनाच उमेदवारी मिळावी अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरु आहे. यामुळे गायकवाडांचे पारडे जड मानले जात आहे.
गायकवाड कुटुंबिय कित्येक वर्षापासून भाजपाशी एकनिष्ठ असून नुकतीच भाजप सदस्य नोंदणी अभियान त्यांनी राबवले आहे. शनिवारी शिवाजी चौकात अश्वजित गायकवाड यांच्या हस्ते सदस्य मोहीम रावबण्यात आली. दिवसभर सुरु असलेल्या या अभियानात भाजपचे जिल्हाअध्यक्ष नागनाथ निडवदे, माजी आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष गोविंदराव केंद्रे, नगराध्यक्ष बसवराज बागवंदे, उपनगराध्यक्ष सुधीर भोसले, पाणीपुरवठा सभापती, मनोज पुदाले, अनुसूचित जाती-जमाती मोर्चाचे बालाजी गवारे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. या नोंदणी मोहिमेसाठी रमाकांत बनाटे, नामदेव आपटे, करण जैन, डॉ. चंद्रकांत कोठारे रुपेंद्र चव्हाण आदींनी पुढाकार घेतला होता.

Comments