अनुपमा चौहान ने ह्या स्वातंत्र्यदिनी एका देशभक्ति गाण्यांने आपली सुरुवात केली.


गायनाच्या क्षेत्रात नवीन तेज-तर्रार अनुपमा चौहान, ह्या स्वातंत्र्यदिना निमित्त ह्या गाण्याने संगीताच्या दुनियेत उतरण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाली आहे. १५ ऑगस्ट रोजी रिलीज झालेले तिचे "सर हिमालय का झुकने ना देंगे" या देशभक्तीपर गाण्याने संगीत विश्वातील पहिल्या पायरी वर पाऊल ठेवताना अनुपमा संगीत रसिकांना भुरळ घालण्यासाठी पूर्णपणे तयार झाली आहे.

संगीत पार्श्वभूमी असलेल्या कुटूंबाशी संबंधित असलेल्या अनुपमा ने वयाच्या ३ वर्षापासून औपचारिक संगीताचे प्रशिक्षण सुरू केले होते. अनुपमा उत्साहाने सांगते, "माझ्या वडिलांनी संगीताचे १४ वर्षे प्रशिक्षण घेतले आणि या कलेबद्दल त्यांची आवड इतकी खोल होती की त्याचा माझ्यावर देखील परिणाम झाला."

हया अपकमिंग सिंगिंग स्टार ने इंडस्ट्रीमधील सर्वोत्कृष्ट लोकांकडून संगीत शिकले आहे. "मी नसीबाने किशोरी आमोणकर यांना भेटले, ज्या संगीत बिरादरी मधील सर्वोत्कृष्ट होत्या. भारतातील सर्वात मोठ्या शास्त्रीय गायकांपैकी तिने मला एका वर्षासाठी संगीत प्रशिक्षण दिले, मी त्यांना ताई म्हणत असे. त्यानंतर मी पद्मभूषण, पद्मश्री आणि पद्मविभूषणने सन्मानित उस्ताद गुलाम मुस्तफा खान साहब आणि त्याचा मुलगा कादिर मुस्तफा खान साहब यांच्याकडून प्रशिक्षण घेतले.

अनुपमा ने आपल्या बॉलिवूड कनेक्ट विषयी सांगितले, "तसे, पार्श्व गायन देखील माहित असणे आवश्यक  आहे आणि त्यासाठी मी ललित पंडित कडून शिकलो आहे. त्याच बरोबर मी भाग्यशाली आहे कि स्वर्गीय रवींद्र जैन यांच्या नेतृत्वात प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली."

आपल्या पहिल्या गाण्याबद्दल ती फार उत्साही दिसत आहे, या गाण्याला खरोखरच प्रतिभाशाली लोकांचा पाठिंबा देखील मिळाला आहे. हया गाणे निर्माण केले आहे रिझवान पांडे, तर गाणे व संगीत के पी सिंग यांचे आहे. संगीत व्हिडिओ नितेश सिन्हा यांनी दिग्दर्शित केला आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर