गौहर खान, राहुल रॉय, जसलीन मथारू, कंगना शर्मा रापची ओटीटी ऐप च्या लोगो लॉन्च मध्ये सहभागी झाले.

आता टेलीविजनच मनोरंजनाचे साधन राहिले नाही, तर आता ओटीटी प्लेटफॉर्म वेब दुनियेत जलद गतिने जोर पकडत आहे. काही ओटीटी एप्स स्वस्त मासिक सदस्यता योजनेसोबत आपले लक्ष आकर्षित करत आहे, लवकरच बाजारात एका नव्या खेलाडूचा उदय होत आहे. रापची ऐपच्या नावाने येणारा हा नवीन ओटीटी प्लेटफॉर्म लवकरच कंटेंट स्पेस वर आपले वर्चस्व गाजविणार आहे. आपल्या ह्या OTT APP च्या लोगो चे उद्घाटन धरम गुप्ता ने मुंबईत जुहू येथील रमादा पाम ग्रोव होटल मध्ये केले. गौहर खान, राहुल रॉय, जसलीन मथारू, कंगना शर्मा, गहना वशिष्ठ, ज्योत्सना चंदोला, टीना घई, साजन अग्रवाल, ब्राइट आउटडोर चे डॉ. योगेश लखानी, हेमंत बिरजे, निगार खान व काही लोक खास करुन उद्घाटन सोहळयात सहभागी होण्यासाठी आले होते. ह्या कार्यक्रमात कंगना शर्मा ने लाइव सादरीकरण केले.

उत्कृष्ट व्यापार कौशल्य दाखविणारे आणि प्रोडक्शन मध्ये एक दशकाहून जास्त अनुभवाचे श्री धरम गुप्ता, ह्या ओटीटी प्लेटफॉर्मच्या निर्मिती मागील मुख्य व्यक्ति आहे, त्यांनी आपला महान दृष्टिकोण व्यक्त केला. "माझा ऐप  मोठ्या नावासोबत कमजोर तर कदापि नाही, येथे कंटेंट किंग आहे, असे नाही कि फक्त सुप्रसिद्ध चेहरे आहेत. मी ह्या लाइन मध्ये भरपूर कालावधीपर्यंत काम केले आहे आणि मी टेलीविज़न मधून ओटीटी एप मध्ये बदलाव पाहत आहे. हा प्लेटफ़ॉर्म मनोरंजनाचे भविष्य आहे. हा ऐप अशा प्रोडक्शन हाउस आणि लोकांसाठी देखील बनविला गेला आहे, ज्यांच्याकडे सदाबहार स्क्रिप्ट व शो आहेत, परंतु ते मोठे एप्स विकण्यासाठी सक्षम नाही आहे. मी स्वतः हे अनुभविले आहे, जेथे सर्व मोठे ऐप मोठी नावे व चेह-यासाठी उत्सुक असतात, अशामुळेच चांगल्या कंटेंटला नुकसान होऊ शकते, येथे असे नाही आहे. मी ह्या प्लेटफ़ॉर्मला लॉन्च करत आहे, जेणेकरून काही निर्मात्यांना आपले काम दाखविण्यासाठी आपला रस्ता शोधता येऊ शकतो. "

काही मोठे आश्वासनें आणि आश्चर्यकारक क्षमतेसोबत,  रापचे ऐप 15 शोज़ सोबत लाइव होण्यासाठी तयार आहे. " ह्याची सदस्यता एक वर्षांसाठी मोफत आहे आणि ग्राहकांसाठी महान भारतीय कंटेंटचा स्वाद मिळणार आहे, त्याचबरोबर ह्या ऐप वर भरपूर अंतर्राष्ट्रीय सामग्री देखील पहावयास मिळणार आहे. मी सध्या वेगवेगळ्या देशांच्या  6 कंटेंट क्रिएटर्स सोबत संबंध निर्माण करण्याच्या प्रक्रियेत आहे. एवढेच काय तर मला या आधीच ३ देशांची साथ मिळाली आहे, अजून ३ देशांसोबत चर्चा सुरु आहे. हे कंटेंट आपल्या स्थानिक भाषेत देखील पहावयास मिळणार आहे, आमचे शो १० प्रादेशिक भाषांमध्ये देखील उपलब्ध असतील, जेणेकरुन जगातील कानाकोप-यातील लोक ह्या सामग्रीचा आनंद घेऊ शकतील! " धरम गुप्ता ने सांगितले.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर