सलमान खान चा Being Strong
सुपरस्टार सलमान खानच्या बीईंग स्ट्रॉंग फिटनेस इक्विपमेंट ब्रँडचे भव्य प्रदर्शन!
सलमान खान, सोहेल खान, आयुष शर्मा, राजेश राय, रिंकू राय, राहुल देव, जहीर इकबाल, सई मांजरेकर, करणवीर बोहरा, टीजे सिधू, गुरमीत चौधरी, निखिल द्विवेदी , रोहित रेड्डी, सुरज पंचोली, विकास मनकतला यांसमवेत इतर अनेक कलाकारांनी लावली फिटनेस एक्झिबिशनला हजेरी.
सुपरस्टार सलमान खानच्या बीईंग स्ट्रॉंग फिटनेस इक्विपमेंटचे १५ ते १७ नोव्हेंबर दरम्यान मुंबईच्या प्रख्यात गोरेगाव (पूर्व) येथील एनइसी मैदानावर भव्य प्रदर्शन भरविण्यात आले होते. बीईंग स्ट्रॉंग इक्विपमेंटचे उत्पादन भारतातील मोठी फिटनेस उपकरणाची कंपनी जेराई फिटनेस प्रा. लिमिटेड करते. ह्या इक्विपमेंट्सच्या यशस्वी लाँचनंतरच काही महिन्यातच ५०० हुन अधिक जिम्समध्ये ह्या उपकरणांचा पुरवठा यशस्वीरित्या करण्यात आला. या प्रदर्शनात एक विशेष बीईंग स्ट्रॉंग केज तयार करण्यात आली होती, जेथे सर्व प्रकारची फिटनेस आणि वर्कआउट उपकरणे प्रदर्शित केलेली असून ह्यामध्ये पुढच्या पिढीतील इको-ट्रेडमिलसह विद्युतविना काम करणारी अनेक नवीन अत्याधुनिक उपकरणेही उपलब्ध होती. जेराई फिटनेसचे राजेश राय माहिती देतात की, “आम्ही सलमान खानने डिझाइन केलेली आणि संकल्पित केलेली सुमारे १०० उपकरणे प्रदर्शित केलेली आहेत. बीइंग स्ट्रॉंग फिटनेसचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे ‘फिट इंडिया’ चळवळ पुढे नेणे असून, आमची फिटनेस उपकरणे भारतातील सर्व लहान शहरे आणि खेड्यांपर्यंत पोहोचतील हे आम्ही सुनिश्चित करू. आम्ही ऑलिंपिक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सर्वाधिक खेळाडू तयार करणाऱ्या खेड्यांमध्ये दरमहा एका व्यायामशाळेला विनामूल्य उपकरणे उपलब्ध करून देतो. राय पुढे म्हणतात की, “आम्ही प्रत्येक जिम ट्रेनरला परवडणारी उपकरणे बनवत आहोत. जेणेकरुन ते उद्योजक बनतील आणि कोणत्याही समस्येविना स्वत: ची सुविधा केंद्रे स्थापित करू शकतील.”
बीईंग स्ट्रॉंग फिटनेस उपकरणे प्रदर्शित करण्याव्यतिरिक्त नुकतेच बॉडीबिल्डिंग मिस्टर वर्ल्ड जिंकणाऱ्या टीम बीइंग स्ट्रॉंगच्या सदस्यांना सलमान खान यांच्या हस्ते पुरस्कार देखील प्रदान करण्यात आले. प्रसंगी आपल्या लाखो चाहत्यांना प्रोत्साहित आणि प्रेरित करण्यासाठी दबंग कसरत कशी करावी याचे प्रात्यक्षिक देखील सलमान खानने येथे दाखविले. बीइंग स्ट्रॉंग ने ह्या एक्सपोमध्ये स्ट्रॉंगमॅन आणि स्ट्रॉंगवुमन अश्या स्पर्धाचे देखील आयोजन केले होते आणि ह्यात जिंकणाऱ्या विजेत्याला बीइंग ह्युमन ई-सायकल दिली गेली. तसेच बीइंग स्ट्रॉन्गच्या सुपरस्टारचे ऑटोग्राफ असलेल्या गुडी सुपरस्टारकडून देण्यात आल्या. चित्रपट आणि टेलिव्हिजन उद्योगातील काही सेलिब्रिटी तीन दिवसांच्या प्रदर्शनादरम्यान आव्हान स्वीकारण्यासाठी बीइंग स्ट्रॉन्ग केजला भेट दिली.
Comments