दमदार बायको बनली भाग्यश्री मोटे
दिग्दर्शक राजीव एस. रूईया व निर्माता प्रदिप
के. शर्मा व दिपक रुईया यांचा नवा मराठी चित्रपट ‘माझ्या बायकोचा प्रियकर’ मध्ये अभिनेत्री भाग्यश्री मोटे मुख्य भूमिका साकारात आहे व ह्या
चित्रपटांच्या सेट वर भाग्यश्री मोटेबरोबर गप्पा
मारल्या.
० ‘माझ्या बायकोचा प्रियकर’ मध्ये कशा प्रकारचा
रोल आहे ?
-- ह्या चित्रपटात मी दमदार बायको बनली असून माझ्या अपोजिट अनिकेत विश्वासराव
आहे. चित्रपटांच्या कथानकानुसार आम्ही दोघे नवरा-बायको आहे व लग्नानंतर हनिमुनच्या
रात्री आमच्यात असं काही तरी आगळे-वेगळे घडत की त्यानंतर फारच धम्माल-मस्तीचे
हास्यमय वातावरण निर्माण होते.
० अनिकेत विश्वासराव सोबत काम करताना काय अनुभव
आला ?
-- अनिकेत विश्वासराव टैलेन्टेड एक्टर
आहे व आपल्या सहकलाकाराला उत्तम प्रकारे संभाळून घेतो. एवढंच काय तर सीन मध्ये
काही सुधार करायचा असेल तर टीप्स देखील देतो व त्यामुळे काम करताना फारच मजा येते.
आमच्या दोघांची केमिस्ट्री बघण्याजोगी आहे.
रोमांटिक कपल्सची रोमांटिक मोज-मस्ती हया सिनेमातून प्रेक्षकांना पहावयास मिळणार
आहे.
०
‘माझ्या
बायकोचा प्रियकर’ ची खास वैशिष्ट काय आहे ?
-- मनोरजंनाचा खजाना म्हणजेच ‘माझ्या बायकोचा
प्रियकर’ आहे.
कौंटुबिक पृष्ठीभूमिवर आधारीत सिनेमाची कथा असून सिचुएशनल कॉमेडीचा आगळा-वेगळा
मराठमोळा तडका दिलेला आहे. प्रेक्षकांचे १०० टक्के मनोरजंन होईल ह्याबद्दल तर काही
शंकाच नको.
०
राजीव एस. रूईया यांच्या दिग्दर्शनाखाली काम करताना काय अनुभव आला ?
-- राजीव सरांचे दिग्दर्शन फारच सुरेख आहे व ते कलाकारांकडून उत्तर प्रकारे
काम करून घेतात. त्यांना जे हवे असते ते सीन शूट करण्यापूर्वी सांगतात व ह्या सीन
मध्ये कशा प्रकारचा सुधार करावयाचा आहे का ? हे देखील विचारतात व त्यानुसार देखी बदलाव करतात.
०
अन्य कोणते प्रोजेक्ट सुरु आहे ?
-- सध्या तरी ‘माझ्या
बायकोचा प्रियकर’ चे शूटिंग जोरात करत आहे. तसेच एक मराठी चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे, परंतु
त्याचे नाव अजून फाइनल झाले नाही आहे.
Comments