दुबईत मिळाला संजीव गुप्ता यांना 'स्टारडस्ट अचीवर्स एवार्ड'

मागील काही काळात मुलींवर एसिड अटैक फेकण्याची फारच वाईट समस्या पहावयास मिळाली आहे व त्यामुळे एसिड अटैक ज्या मुलींवर झाला आहे, त्यांचे आयुष्य पूर्णपणे उद्धवस्त होते. अशाच मुलींची मदत करण्यासाठी बॉलीवुडचा अभिनेता सोनू सूद व स्टारडस्ट ने मिळून एक संकल्प केला आहे व त्यासाठीच त्यांनी २१ सप्टेंबर, २०१७ रोजी दुबईत 'डब्लू' मध्ये 'स्टारडस्ट अचीवर्स एवार्ड -२०१७' ह्या इवेंटचे आयोजन केले होते व त्यामध्ये ग्लोबल एडवर्टाइज़र्स ने आपल्या आउटडोर पब्लिसिटी (होर्डिंग) च्या माध्यमातून सहकार्य केले.

ह्या कार्यक्रमात ग्लोबल एडवर्टाइज़र्सला भारतातील मुख्य आउटडोर जाहीरात (होर्डिंग) उद्योगसाठी  उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल ग्लोबल एडवर्टाइज़र्स चे मैनेजिंग डायरेक्टर संजीव गुप्ता यांना 'स्टारडस्ट अचीवर्स एवार्ड' देऊन सम्मानित करण्यात आले.

दुबईहून एवार्ड घेऊन आल्यानंतर बॉलीवुड़ मार्केट चे संपादक शंकर मराठे यांनी बोरिवली स्थित ऑफिस मध्ये शनिवार, २३ सप्टेंबर,  २०१७ रोजी ग्लोबल एडवर्टाइज़र्स चे एमडी संजीव गुप्ता यांना शुभेच्छा दिल्या व एवार्ड बद्दल चर्चा केली.

संजीव गुप्ता यांनी सर्वात पहिले गुरु मां श्री राधे मां चे आभार मानले व म्हणाले कि त्यांच्या कृपेमुळेच आम्ही येथे पोहोचलो आहे. आम्ही नेहमीच ग्राहकांना चांगली व उत्कृष्ट सेवा देण्याचा प्रयत्न करतो. ग्राहकांना फायदा होईल तरच आम्हांला देखील फायदा होईल व ते नेहमीच आमच्याकडे राहतील.


ह्या इवेंट मध्ये ग्लोबल एडवर्टाइज़र्स चे एमडी संजीव गुप्ता सोबत बॉलीवुड मधील कलाकार  पोलिटीशियन व स्पोर्ट्समैन उपस्थित होते जसे करीना कपूर, सोनू सूद, फराह खान, साजिद खान, हुमा कुरैशी, नारी हिरा, जया प्रदा, पकंज अडवाणी, अमर सिंग, ग्रेट खली, सोहेब मलिक व अन्य.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

LESBIAN SHOOT, A CONCEPT BY SHAAN PHOTOGRAPHY WITH MODEL/ACTRESS YASMEEN KHAN AND NATHASSHA SIKKA