साउथचे डबिंग केलेले मराठी चित्रपटामुळे मराठी चित्रपट इंडस्ट्रीला धोका
जुलै
महिन्यात झी टॉकीच वर साथचे डबिंग केलेले मराठी चित्रपट सुरु झाल्यामुळे आता तर
चक्क मराठी चित्रपट इंडस्ट्री पुढे नवीन संकट उभे राहिले आहे. तसे पाहिले तर
साउथचे गाजलेले चित्रपट मराठी भाषेत डब करुन दाखवायला काही जास्त खर्च येत नाही,
पंरतु असेच साउथचे डबिंग केलेले मराठी चित्रपट झी बरोबर इतर ही मराठी वाहिन्यावर
भविष्य काळात सुरु झाले तर नक्कीच मराठी चित्रपटाचे ३-१३ वाजल्याशिवाय राहणार
नाही. त्यांचे कारण आहे साउथ च्या चित्रपटांचा स्टैंडर्ड. साउथचे चित्रपटात
जबरदस्त खर्च केलेला असतो तर मराठी चित्रपट जेम-तेम १ ते जास्तीत जास्त २ कोटी
रुपयात बनतो. जिथे साउथचा चित्रपटा कमीत-कमी ५०-६० कोटीत बनतो तिथे मराठी चित्रपट
काय टिकणार.... यात तर काही शंकाच नको..
मराठी
चित्रपट इंडस्ट्रीला २०१३ साली १०० वर्षें पूर्ण झाली आणि जणू काही मराठी
चित्रपटांना सुगीचे दिवस लागले होते खरे, पण आता साउथचे डबिंग केलेले मराठी चित्रपट छोट्या
परद्यावर आल्यामुळे तर भविष्यात महाराष्ट्रातील थिएटर मध्ये मराठी प्रेक्षक वर्ग
जाईल तरी कसा...
Mobile – 92229 63188
Comments