अमिताभ बच्चन यांनी गाणं स्वरबद्ध केल्यामुळे तनवीर गाजी चे जीवन सोनेरी झाले
पाषाणरुपी दगडाला जेव्हा पारस धातूचा स्पर्श होतो व त्यांचे रुपांतर सोन्यात होते, असेच झाले आहे गीतकार तनवीर गाजी यांच्या जीवनात. मूळचा अमरावती येथील गीतकार तनवीर गाजी यांना महाराष्ट्र साहित्य एकेडेमीचा पुरस्कार मिळालेला आहे. त्याचबरोबर ‘मंथन’ व ‘हेट स्टोरी’ सारखा चित्रपटांतून गाण्यांचा जलवा दाखविल्यानंतर आता तनवीर यांनी ‘पिंक’ व ‘एक था हीरो’ ह्या चित्रपटासाठी देखील गाणी लिहिली आहे. चित्रपट ‘पिंक’ मध्ये तनवीर ने लिहिलेल्या एका गाण्याला चक्क महानायक अमिताभ बच्चन यांनी आपला आवाज दिला आहे. चित्रपट ‘पिंक’ १६ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे तर ‘एक था हीरो’ हा सिनेमा २३ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
जेव्हा अमिताभ बच्चन यांनी तनवीर गाजी लिखित गाण्यांच्या काही ओळी स्वरबद्ध केल्या व त्यांनी ह्या गाण्याची रिकॉर्डिंग झाल्यानंतर चक्क तनवीर गाजी चे फोन करून कौतुक देखील केले. ह्याबद्दल तनवीर गाजी ने सांगितले कि ‘मैं अमिताभ बच्चन बोल रहा हूं’ हे शब्द ऐकण्यासाठी भारत देशातील प्रत्येक व्यक्तिचे कान आतुरतेने वाट पहात असतात व जेव्हा असा आवाज फोन वर ऐकू येतो, तेव्हा जणू काही रात्री पाहिलेले स्वप्नच साकार झाल्यासारखे वाटते. अमिताभ बच्चन यांनी मी लिहिलेल्या गाण्याचे मनापासून कौतूक केले व माझ्याबरोबर ४०-५० सेकंद चर्चा देखील केली.
तनवीर गाजी द्वारा लिखित गाण्याला महानायक अमिताभ बच्चन यांनी स्वरबद्ध केल्यामुळे तनवीरच्या लेखन शैलीला सोन्याचा सोनेरी रंग प्राप्त झाला आहे व बॉलीवुड़च्या दुनियेत तनवीरची एक नविन छाप जन्माला आली आहे.
तनवीर गाजी ने आपल्या लेखन प्रवासाबद्दल सांगितले कि मी आतापर्यंत एक गीतकार-लेखक म्हणूनच मनापासून कार्य करत राहिलो व अनेक प्रकारची गाणी लिहीली, परंतु एके दिवशी मी लिहिलेल्या गाण्याला अमिताभ बच्चन स्वरबद्ध करतील, असे स्वप्नात देखील वाटले नव्हते. परंतु बॉलीवुड़ च्या हिंदी चित्रपटांसाठी चांगली गाणी लिहिणे हेच एकमात्र लक्ष्य मनात होते.
Comments