पदमश्री अनूप जलोटा यांनी रविन्द्र जैन चे शेवटचे दोन एल्बम लांच केले


एल्बम चाहे राम भजो चाहे श्याम रविन्द्र जैन चा शेवटचा एल्बम आहे, त्यामध्ये त्यांनी फक्त गाणीच गायली नाही, तर भजन देखील लिहिले आहे आणि संगीत देखील दिले आहे. हा एल्बम श्री राम व श्री कृष्णा यांना समर्पित आहे. ह्या एल्बम मध्ये रविन्द्र जैन सोबत तरन्नुम मलिक, पदमा जोगलेकर, सतीश देहरा, दीपमाला आणि मीनल जैन यांनी देखील भजन गायले आहेत. हा एल्बम अनूप जलोटा, आयुष्मान, दिव्या जैन व निर्मला जैन यांनी रिलीज़ केला आहे.

दुसरा एल्बम जपले प्रभु का नाम लिहिला आहे सुप्रसिद्ध लेखिका निर्मला जैन ने, संगीत दिले आहे रविन्द्र जैन यांनी. ह्या एल्बम मध्ये रविन्द्र जैन सोबत तरन्नुम मलिक, पूनम राज, पियशि सेनगुप्ता, तृप्ति शाक्या व मेहक मोंगा यांनी देखील भजन गायले आहेत. हे दोन्ही एल्बम आर जे सिरीज़ ने रिलीज़ केले आहेत. ही कंपनी रविन्द्र जैन व त्यांची पत्नी दिव्या जैन यांनी काही वर्षीपूर्वी सुरु केली आहे.

हे एल्बम यूट्यूब, सावन, गाना, आई ट्यून्स वर उपलब्ध आहेत. अधिक माहिती साठी वेबसाइट  - www.ravindrajaingroup.com वर लॉग ऑन करा.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर