म्यूजिक इंडस्ट्रीत नाव कमवायचे आहे – संदीप बत्रा
सिनेमाच्या दुनियेत गीत-संगीताची नशा ही जरा वेगळीच आहे. जुन्या काळापासून चित्रपटांतून गीत-संगीताची किमया गाण्यातून बघायला मिळाली आहे. एखाद्या चित्रपटातील एक गाणं जरी लोकप्रिय झाले, तरी दर्शक तो चित्रपट सुपरहिट करत असे. असाच एक गायक व संगीतकार आहे संदीप बत्रा. गायक संदीप बत्रा हे फेम गुरुकुल म्यूजिकल शो मध्ये टॉप फाइनलिस्ट होते.
संदीप चे गीत-संगीताशी नातं एकदम जवळचे आहे कारण त्याच्या आजोबांना गीत-संगीताची आवड होती व घरातुनच जेव्हा गीत-संगीताचे धडे मिळतात, तेव्हा नक्कीच एक नव कमळ जन्माला येते, त्याप्रमाणे संदीपच्या मनावर लहानपणापासूनच गीत-संगीताची जादू रुजली गेली.
काही म्यूजिक एलबम मध्ये आपल्या मधूर संगीताची जादू दाखविल्यानंतर आता सिनेमाच्या दुनियेत हिंदी चित्रपट ‘एक था हीरो’ साठी संदीप बत्रा ने संगीत दिले आहे व आपल्या मधूर स्वरांचा जलवा देखील दाखविला आहे.
संदीप बत्रा ने सांगितले कि सिनेमाच्या दुनियेत मला खूप काम करायचे आहे. ए आर रहमान यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच मी संगीत बनवितो. चित्रपट ‘एक था हीरो’ मधील संगीत नक्कीच सर्वांना आवडेल.
संदीप ने चित्रपटाचे प्रमोशनल सांग ‘आतिश’ गायले, जे सुप्रसिद्ध गीतकार तनवीर ग़ाज़ी यांनी लिहीले आणि त्याचे संगीत स्वतः संदीप बत्रा ने तयार केले आहे. संदीप ने ह्या चित्रपटांतील दोन गाणी मोंटी शर्मा साठी गायली आहेत.
भविष्यात संदीप ने ठरविले आहे कि सिनेमाच्या दुनियेत म्यूजिक डायरेक्टर म्हणून काम करता-करता गायक म्हणून देखील चांगले काम करायचे आहे. दर्जेदार व उत्तम म्यूजिक बनविणे व मधूर गाणी गात रहावे.
Comments