सुनेशी ‘फ्लर्ट’ करणारा सासरा
सिंहासन’मधील त्यांची अर्थमंत्री विश्वासराव दाभाडे ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या तितकीच पसंतीस उतरली. खलनायकाची झालर असणाऱ्या या व्यक्तिरेखेतील मंत्री आपले राजकीय इप्सित साध्य करण्यासाठी सुनेचा कसा वापर करतो, हे त्यांनी आपल्या सहजसुंदर अभिनयातून साकारले आहे. त्याचवेळी सुनेशी ‘फ्लर्ट’ करणारा सासराही त्यांच्या व्यक्तिरेखेत प्रेक्षकांना पाहायला मिळाला. या चित्रपटात मुख्यमंत्र्याची भूमिका साकारणारे अरुण सरनाईक आणि श्रीराम लागू यांच्यातील तोडीस तोड अभिनयाने प्रेक्षकांना तिकीट खिडकीकडे खेचून आणले. दोघांमधील कटकारस्थाने, कुरघोडींनी भारतीय राजकारणाचे यथार्थ दर्शन घडवले.
Comments