आटपाडी नाईट्स’चा भन्नाट ट्रेलर प्रदर्शित
‘पण एक प्रॉब्लेम आहे महाराज, तुमचा रात्रीचा काहीतरी घोळ आहे’ या वाक्यामुळे आणि ‘प्रेमाचा जांगडगुत्ता’ या धम्माल गाण्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढवलेल्या बहुचर्चित ‘आटपाडी नाईट्स’चा भन्नाट ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मायदेश मीडिया आणि सुबोध भावे प्रस्तुत ‘आटपाडी नाईट्स’ या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन नितिन सिंधुविजय सुपेकर यांनी केले आहे, तर प्रणव रावराणे आणि सायली संजीव यांची जोडी मुख्य भूमिकेत आहे.
Comments