डॉ. श्रीराम लागू विज्ञानवादी होते
ते विज्ञानवादी होते. अंधश्रद्धा चळवळीतही त्यांनी हिरिरीने सहभाग नोंदवला. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यासोबत त्यांनी समाजातील अपप्रवृत्तींविरुद्ध लढा दिला. ते गांधीवादी होते. त्यांचे विचार समाजवादाकडे झुकलेले होते. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे ते खंदे समर्थक होते. ‘घाशीराम कोतवाल’, ‘सखाराम बार्इंडर’सारखी नाटके वादात सापडली तेव्हा ते निर्मात्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. आणीबाणी ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला होती, असे त्यांचे मत होते. त्यातूनच त्यांनी ‘अँटिगणी’ हे नाटक केले होते.
Comments