तमासगीर महिलेच्या मोहजाळात अडकलेल् मास्तर
नटसम्राट’मधील गणपत ऊर्फ आप्पासाहेब बेलवलकर त्यांनी अमर केला, तशीच व्ही. शांताराम यांच्या ‘पिंजरा’मध्ये त्यांनी साकारलेली मास्तरची व्यक्तिरेखा अजरामर ठरली. आदर्श व्यक्तिमत्त्वाच्या एका शाळा शिक्षकाची कारुण्यपूर्ण ठरलेली जीवनगाथा त्यांनी अत्यंत ताकदीने रंगवली. तमासगीर महिलेच्या मोहजाळात अडकलेल्या मास्तरचा तमाशाच्या फडातील तुणतुण्यापर्यंतचा त्यांनी साकारलेला प्रवास प्रेक्षकांना विलक्षण भावला. त्यांच्या सर्वार्थ अभिनयामुळे ‘पिंजरा’ मराठी सिनेसृष्टीतील मैलाचा दगड ठरला.
Comments