धार्मिक मालिका जय मल्हार

मणी आणि मल्ल या उन्मत्त दैत्यांनी भूतलावर उच्छाद मांडत सप्तर्षींच्या पूजेत वारंवार विघ्न आणलं. त्रस्त सप्तर्षींच्या विनंतीनुसार महादेवांनी मार्तंड भैरवाचा अव
तार धारण करून मणी आणि मल्लाचं पारिपत्य केलं. असुरांच्या त्रासापासून मुक्त झालेल्या सप्तर्षींनी महादेवांना भूतलावर वास्तव्य करण्याची विनंती केली. त्यानुसार मल्हारी मार्तंडाच्या म्हणजेच खंडोबाच्या रूपात महादेवांनी जेजुरी नगरीत वास केला. शिवभक्त तिम्माशेठ यांच्या अत्यंत अनुरूप कन्येचं – म्हाळसेचं स्थळ खंडोबासाठी चालून आलं. त्याच वेळी देवर्षी नारदांनी खंडोबांना बाणाई नावाची महादेवांची एक अत्यंत निस्मीम भक्त असल्याची माहिती दिली. खंडोबांची भेट आधी कोण घेईल - म्हाळसा आणि बाणाई ?

झी मराठी वर धार्मिक मालिका जय मल्हार चे सोमवार ते शनिवार ७ वाजता प्रक्षेपित होत आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर