ग्लैमरस नटी बनली तेजा देवकर

सध्या तर फिल्म इंडस्ट्री मध्ये मराठी चित्रपटाने जणू काही धूमाकूळच घातला आहे. हिंदी चित्रपटा प्रमाणेच आता मराठी चित्रपट देखील बनु लागले आहेत. नव-नवीन कथानकावर मराठी चित्रपट बनत आहेत व चित्रपट बनविण्याची स्टाइल देखील आता हिंदी प्रमाणेच झाली आहे. अशाच एका आगळा-वेगळ्या कथानका वर चित्रपट येत आहे नटी.

सूर्यतेज प्रोडक्शन च्या बैनर खाली निर्मित गिरीश भदाणे – नीता देवकर चा नवा चित्रपट नटी मध्ये अभिनेत्री तेजा देवकर ने मुख्य भूमिका साकारली आहे. ह्या चित्रपटात तेजा ने कशा प्रकारची भूमिका साकारली आहे व अन्य अनेक प्रश्नांची उत्तरे तेजा ने एकदम झकास स्टाइल मध्ये दिली. मुंबई मधील अंधेरी पश्चिम स्थित तेजा देवकर च्या घरी घेतलेली एक झकास मुलाखत –

चित्रपट नटी ची कथा स्व. अभिनेत्री जिया खान वर आधारित आहे असे काही वर्तमान पत्रात प्रकाशित झाले होते, हे खरं आहे का ?
हे सर्व काही खोट आहे. खरं सांगू का चित्रपट नटी ची शूटिंग सुरु होऊन ५-६ महीने झाले होते त्यावेळी काही मिडिया वाल्यांनी चित्रपट नटी चा प्रचार असा केला होता कि ह्या मध्ये स्व. अभिनेत्री जिया खान ची सुसाइड स्टोरी आहे. परंतु असा काही नाही आहे. ही एक मराठ-मोळी ग्लैमरस नटी आहे. आता तर एवढेच सांगते.

चित्रपट नटी मध्ये कशा प्रकारची अदाकारी दाखविण्याचा प्रयत्न केला आहे ?
ह्या चित्रपटांत माझ्या कैरेक्टरच्या काही शेड्स आहेत. चित्रपटाच्या कथानकानुसार ह्यामध्ये १९६०-२०१३ चा कालखंड दाखविला आहे. मी एका गावातली मुलगी आहे व माझे वडिल एक वायरमैन आहे, परंतु माझे लहानपणापासून हीरोइन बनण्याचे स्वप्न असते. एवढंच काय तर लहानपणापासूनच मी नाटक, नृत्यांचे कार्यक्रमातून एकदम जोमाने भाग घेत असे. मला नाचयला आवडत असे, परंतु माझ्या आई-बाबांना हे नाच-गाणे अजिबात आवडत नव्हते. मला हीरोइन बनायचे होते म्हणूनच मी माझे स्वप्न पूर्ण करण्याकरिता मुंबई नगरीत आले. काही दिवस फारच हाल-अपेष्टा भोगाव्या लागल्या. काही दिवस स्टूडिओच्या फे-या मारल्या, तेव्हा कुठे जूनियर आर्टिस्ट चे काम मिळाले व त्यानंतर मी कधीच मागे वळून पाहिले नाही. फार मेहनत करून व फिल्म लाइन मधील दुनियादारी शिकूनच मोठी टॉपची एक्ट्रैस बनली.

फिल्म इंडस्ट्री मध्ये टॉपची एक्ट्रैस बनण्यासाठी बरचं काही करावं लागत आणि बरचं काही गमवावं लागत.....
शंकर राव, तुम्ही एकदम अचूक प्रश्न विचारला आहे, परंतु माझ्या मते काही विशिष्ट गोष्ट मिळवायची असेल, तर त्याचा मोबदला तर प्रत्येकाला चुकवावा लागतोच. हे तर प्रत्येक क्षेत्रात होतच असते. एका हाताने टाळी कधी वाजतच नाही. ह्या चित्रपटात एका मराठी नटीचा प्रवास दाखविण्याचा एक आगळा-वेगळा प्रयत्न केला गेला आहे, जो आता पर्यंत मराठी चित्रपटसृष्टीत अचूकपणे दाखविण्याचा प्रयत्न केला नाही. एक टॉपची अभिनेत्री बनण्यासाठी काय-काय करावे लागते व त्यासाठी काय-काय भोगावे लागते. हे चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रिच्या जीवनातील कटू-सत्य दिग्दर्शक योगेश जाधव यांनी दाखविण्याचा नेक व सच्चा प्रयत्न केला आहे. एका मराठ-मोळ्या अभिनेत्रिच्या जीवनातील व्यथा व तिचे जीवन कशा प्रकारचे असते आणि एक ग्लैमरस नटी बनल्यानंतर तिचे जग कसे बदलते. हाच एक आगळा-वेगळा ग्लैमरस नटी चा प्रवास ह्या चित्रपटांत प्रेक्षकांना पहावयास मिळणार आहे.

ह्या चित्रपटा द्वारे पहिल्या वेळी ग्लैमरस रोल साकारला आहे तर हा ग्लैमरस अनुभव कसा वाटला ?
चित्रपट नटी मधील रोल ग्लैमरस रुप-रंगाचा आहे व तो कशा प्रकारे साकारला पाहिजे. ह्याबद्दल पूर्ण कल्पना मला आधीपासूनच होती. एक नायिका किती ग्लैमरस होऊ शकते आणि तितकीच ग्लैमरस नटी मी बनली आहे. हा रोल साकारला फारच चांगला अनुभव आला आहे. हा चित्रपट पाहून नक्कीच माझी तुलना बॉलीवुड मधील टॉपच्या हीरोइन बरोबर होईल. ह्याबद्दल तर काही शंकाच नको, कारण मी आहेच ग्लैमरस नटी.


अभिनेता अंजिक्य देव बरोबर ग्लैमरस सीन करते वेळी तु कितपत कम्फरेटबल होती ?
मी एक अभिनेत्री आहे व माझ्या कैरेक्टरला पूर्णपणे न्याय देण्यासाठी अंजिक्य देव बरोबर हॉट एंड सेक्सी सीन दिले आहेत. तसे पाहिले तर अंजिक्य देव फारच गुणी एक्टर आहे व तो आपल्या सहकलाकाराला पूर्णपणे सहयोग करतो. ह्या चित्रपटातील सेक्सी सीन करताना कोणताही वल्गरपणा जाणविला नाही.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर