प्रिया बेर्डेची लव्हस्टोरी

बॉलिवूडमध्ये ज्याप्रमाणे ‘अमिताभ आणि रेखा’, ‘शाहरुख आणि काजोल, ‘सलमान आणि ऐश्वर्या’ ह्या जोड्या लोकप्रिय आहेत तश्याच मराठी चित्रपटसृष्टीत सुद्धा काही एव्हरग्रीन जोड्या आहेत. ‘दादा कोंडके आणि उषा चव्हाण’, ‘अशोक सराफ आणि निवेदिता जोशी’, ‘सचिन आणि सुप्रिया’ ह्यासारख्या लोकप्रिय जोड्यांनी मराठी प्रेक्षकांची मने जिंकली. ह्या जोडीमध्ये अजून एक जोडी अशी होती ज्यांना प्रेक्षकांनी अक्षरक्ष डोक्यावर घेतले होते. ती जोडी म्हणजेच ‘लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे’. ह्या जोडीने मराठी चित्रपटसृष्टीवर तर राज्य केलेच पण हिंदी चित्रपटांमध्येही हि जोडी चमकली. चित्रपटांमध्ये चांगली केमिस्ट्री जमलेली हि जोडी नंतर खऱ्या आयुष्यात सुद्धा एकत्र आली.

लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया अरुण ह्यांनी एकत्र अनेक मराठी चित्रपटांत काम केले. ह्या जोडीने ‘अशी हि बनवा बनवी’, ‘रंगत संगत’, ‘डोक्याला ताप नाही’, ‘शेम टू शेम’, ‘कुठं कुठं शोधू मी तिला’, ‘नशीबवान’, ‘येडा कि खुळा’ ह्यासारख्या अनेक मराठी चित्रपटांतून प्रेक्षकांची मने जिंकली. ह्या जोडीने हिंदी चित्रपटातही एकत्र काम केले. ‘हम आपके है कौन’, ‘बेटा’, ‘अनारी’, ‘दिदार’ ह्यासारख्या निवडक हिंदी चित्रपटात हि जोडी चमकली. चित्रपटांत एकत्र काम करत असताना त्यांची केमिस्ट्री कधी जुळत गेली हे त्यांनाही समजले नाही. त्याकाळी लक्ष्मीकांत बेर्डे हे नाव म्हणजे सुपरस्टार.

लक्ष्या म्हणजे विनोदाचा बादशाह. चित्रपटांत लक्ष्या असला म्हणजे चित्रपट सुपरहिटच हे समीकरण जणू ठरलेलंच होतं. त्यामुळे अनेक मराठी अभिनेत्री लक्ष्मीकांत बेर्डेसोबत काम करायला मिळावे म्हणून प्रयत्नशील असायच्या. काही नवीन अभिनेत्रींनीं लक्ष्यासोबत चित्रपट करून रुपेरी पर्दापण केले, तर लोकप्रिय अभिनेत्रींनाही आपल्या चित्रपटात लक्ष्याचा हिरो असावा असे वाटायचे. परंतु दिग्दर्शकाची लक्ष्यासाठी नायिका म्हणून पहिली पसंती प्रिया अरुणला असायची.

ह्याचे कारण म्हणजे चित्रपटांप्रमाणेच चित्रपटाच्या सेटवर सुद्धा दोघांमध्ये खूप चांगली केमिस्ट्री असायची. लक्षाच्या प्रत्येक विनोदाला मग तो शूटिंगसाठी कॅमेरासमोर असो किंवा शूटिंग नसताना असो, लक्ष्याच्या प्रत्येक विनोदाला प्रियाची दाद असायची. लक्ष्याला मासे खायला खूप आवडतात हे प्रियाला माहिती होते. त्यामुळे ती अनेकदा लक्ष्यासाठी मासे आणायची. ‘एक होता विदूषक’ ह्या चित्रपटासाठी सर्वोत्तम अभिनेत्याचा राज्यपुरस्कार थोडक्यात हुकल्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांना वाईट वाटले होते. ह्याची प्रियाला लगेच कल्पना आली. तेव्हा प्रियाने लक्ष्याची समजूत काढली होती. चित्रपट आणि चित्रपट माध्यमांद्वारे लक्ष्मीकांत बेर्डे एक यशस्वी अभिनेता म्हणून कसे आहेत हे प्रेक्षकांना आणि अनेकांना माहिती होते. परंतु ते एक व्यक्ती म्हणून कसा आणि किती सुखी किंवा दुखी आहे ह्यासाठी प्रिया जवळची साक्षीदार किंवा साथीदार बनत होती. अश्या नात्याला त्यावेळी काही नाव नसतं. दोघांमध्ये अस्सल बांधिलकी वाढली.

त्याच काळात रुही बेर्डे ह्या स्वर्गवासी झाल्या. लक्ष्मीकांत बेर्डे एकटे पडले होते. एकाकी पडलेल्या लक्षाला सावरण्यासाठी प्रियाचीच हक्काची साथ होती. ह्याच टप्प्यावर प्रिया अरुण हि प्रिया बेर्डे झाली. दोघेही लग्नाच्या पवित्र नात्यात गुंफले गेले. दोघांच्या नवीन प्रवासाला सुरुवात झाली. लग्नानंतर लक्ष्मीकांत बेर्डे मराठी चित्रपटांसोबतच हिंदी चित्रपटांमध्येही व्यस्त झाले. ह्याच संसारात ह्या दोघांना मुलगा झाला. त्यांनी आपल्या मुलाचे नाव अभिनय ठेवले. वडील बनण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाल्यामुळे ते एखाद्या लहान मुलाप्रमाणे हि बातमी अनेकांना सांगत असत. प्रियासुद्धा खूप आनंदात होती. पुढे मग दीड वर्षांनी त्यांना मुलगी झाली. तिचे नाव स्वानंदी ठेवण्यात आले. आपल्या मुलांचे संगोपन आणि पालकत्व अनुभवण्यात आनंद घेत असतानाच आणि हि दोन्ही मुलं लहान असतानाच लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांना स्वर्ग वासी झाले. आज प्रियाने आपल्या दोन्ही मुलांचे संगोपन केले आहे. अभिनयने कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच ‘ती सध्या काय करते’ ह्या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पर्दापण केले. त्याचा काही महिन्यापूर्वी रिलीज झालेला चित्रपट म्हणजे ‘रंपाट’. 

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर