Ek the film industry ke Rajkumar

बॉलिवुड चित्रपट सृष्टीमध्ये अनेक सुपर हिट सिनेमे देणारा हा अभिनेता आपल्यात आता जरी नसला तरी त्यांचे गाजलेले सिनेमे आपण अजूनही पाहतो आणि त्यातील राजकुमार ह्यांचा अभिनय आपल्या काळजाला भिडून जातो. त्यांनी अनेक चित्रपट केले त्यातील सौदागर, तिरंगा, जंगबाज, मदर इंडिया, पाकीज़ा आणि हीर राँझा हे चित्रपट लोकांना फार आवडलेही होते. या प्रत्येक चित्रपटात त्यांचे वेगवेगळे डायलॉग प्रसिद्ध होते. तसेच त्याचे डायलॉग बोलताना मानेवरून हात फिरवताना तुम्ही नेहमी पाहिले असेल. तुम्हाला कदाचित वाटले असेल की ही त्यांची एक प्रकारची अॅक्टींग असेल पण तसे नाही त्यासाठी एक वेगळे कारण आहे.
बलुचिस्तान मध्ये जन्मेलेल राजकुमार हे मुंबई मध्ये माहीम पुलिस स्टेशनमध्ये सब इन्स्पेक्टर होते. त्यांचे खरे नाव कुलभूषण पंडित होते. एकदा त्यांच्या सहकाऱ्यानी त्यांना सांगितले की सर आपण शरीराने आणि चेहऱ्याने एखाद्या हिरो सारखे दिसता तुम्ही सिनेमात जाण्यासाठी प्रयत्न करा. तेव्हापासून राजकुमार ह्यांनी ही गोष्ट मनावर घेतली. ज्या पोलीस स्टेशन मध्ये ते कार्यरत होते तिथे नेहमी कलाकारांचे येणे जाणे चालूच असायचे. एक दिवस निर्माता बलदेव दुबे काही कामानिमित्त स्टेशन मध्ये आले होते. तेव्हा त्यानी राजकुमार ह्याची एक झलक आणि त्यांचा अंदाज पाहूनच त्यांना आपल्या शाही बाजार सिनेमात घेतले. तेव्हापासून त्यांच्या सिने कारकिर्दीला सुरुवात झाली.
तुम्हाला माहीतच असेल की राजकुमार यांना कॅन्सर सारखा घातक आजार होता आणि हा आजार त्यांना सिगारेट पिण्यामुळे झाला होता. त्यांना सिगारेट पिण्याची खूप जास्त सवय होती आणि त्यामुळे त्यांना गळ्याचा कॅन्सर झाला होता. ह्यामुळे त्यांच्या गळ्यामध्ये खूप जास्त दुखायचे आणि जेव्हा ते डायलॉग बोलायचे तेव्हा हा त्रास त्यांना खूप व्ह्यायचा. त्यामुळे ते डायलॉग बोलताना आपल्या मानेवरून सतत हात फिरवायचे आणि त्यामुळे त्यांचा आवाज ही खूप भरडा झाला होता. 3 जुलै 1996 मध्ये 69 वर्षाचे असताना या आजाराने त्यांचा शेवट केला.

आपल्या शेवटच्या दिवसात त्यांनी आपला मुलगा पुरू राजकुमार ह्याला जवळ बोलावले आणि म्हटले बाळा आयुष्य आणि मृत्य प्रत्येकाचे खाजगी असतं. माझा जर मृत्य झाला तर ते फक्त माझा मित्र चेतन आनंद शिवाय कुणालाच सांगू नकोस. माझा अंतिम संस्कार झाल्यानंतरच जगासमोर ही गोष्ट आण.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

LESBIAN SHOOT, A CONCEPT BY SHAAN PHOTOGRAPHY WITH MODEL/ACTRESS YASMEEN KHAN AND NATHASSHA SIKKA