श्रेया" या भूमिकेमुळे ओळख मिळाली - अभिनेत्री अदिती येवले
मराठी इंडिस्ट्रीत अभिनेत्री म्हणून नावलौकिक मिळवणारी अभिनेत्री अदिती येवले, भूमिकेची जाण आणि सतत काहीतरी नवीन करण्याची धडपड अदिती मद्धे जाणवते. आजवर तिने वेलकम जिंदगी, विकून टाक, नेबर्स अश्या चित्रपटातून तिने भूमिका केल्या असून एक नंबर, रुंजी, तसेच कुलस्वामिनी अश्या अनेक मालिकांमधून ती रसिकांच्या समोर आली आहे. नेबर्स हा तिचा चित्रपट कोरोना व्हायरस च्या जागतिक संकटामुळे पुढे गेला.
एकंदरीत आजवरच्या काराकिर्दीबाबत तिच्याशी चर्चा केली असता तिने कुलस्वामिनी या मालिकेतली श्रेया या भूमिकेमुळे आपल्याला ओळख मिळाली आणि त्यामुळेच घराघरात पोहोचता आलं असल्याचं सांगितलं, सध्या अदितीकडे मराठी सोबतच काही पंजाबी चित्रपटाच्या देखील ऑफर्स आहेत, त्यामुळे कथा चांगली असेल तर निश्चित त्यामद्धे काम करायला आवडेल असं अदिती सांगते.
Comments