बाई वाड्यावर या म्हणणारे निळू फुले मराठी चित्रपट सृष्टीतील खलनायक

निळू फुले यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका केल्या असल्या तरी संपूर्ण महाराष्ट्राला आवडणारा हा अभिनेता यांचे संपूर्ण नाव नीलकंठ कृष्णाजी फुले हे होय. पुण्यामध्ये जन्माला आलेले निळू फुले तसे घरी गरिबीत दिवस काढत होते. त्यांचे वडील लोखंड आणि भाजी विकून आलेल्या पैशात आपल्या घर चालवायचे. आणि म्हणून पैशाची अडचण असल्यामुळे ते कमीत कमी दहावी पर्यंत शकले आणि त्यानंतर त्यांनी व्हणवडी येथील लष्करी महाविद्यालयात माळी म्हणून काम करायला सुरुवात केली.

दिवसभर काम करून रात्री पुस्तक वाचायचे त्यांना झाडांची नर्सरी उघडायची होती पण तेव्हा पैसा नसल्यामुळे ते शक्य नव्हते. त्यावेळी त्यांना माळी कामाचे महिन्याला 80 रुपये इतका पगार मिळायचा. त्यातील 10 रुपये ते राष्ट्र सेवा दलाला द्यायचे. त्यानंतर त्यांनी माळी काम सोडून आपला मोर्चा अभिनायकडे वळवला. त्यांनी पू ल देशपांडे यांच्या नाटकामध्ये काम केले. यात प्रेक्षकांना निळू फुले यांचं अभिनय खूप पसंतीस उतरले. नाटकामध्ये काम करता करता या अभिनेत्याला एक चित्रपट मिळाला अनंत मने यांचा तो म्हणजे “एक गाव बारा भानगडी”,

यानंतर त्यांनी मागे न पाहता पुढे जाण्याचे ठरविले. सामना या चित्रपटातील त्यांची नकारात्मक भूमिका बघताच प्रेक्षकांच्या आवडीस उतरलेली ही खलनायकाची भूमिका एखाद्या अभिनेत्याला ही लाजवेल अशीच होती. सामना चित्रपटातील निळू फुले आणि श्रीराम लागू यांची एकत्र भूमिका पाहणे म्हणजे प्रक्षकांसाठी एक पर्वणीच होती.

त्यानंतर त्यांच्याकडे एकावर एक असे चित्रपट येत गेले या अभिनेत्याने खलनायकाची भूमिका इतक्या अचूक पने साकारायचा की, रसिकांच्या मनात त्यांच्याबाबत खूप जास्त तिरस्कार केला जायचा. खरतर हेच त्यांच्या अभिनयाचं कौशल्य आहे पण त्यानंतर त्यांनी चित्रपट वेगवेगळ्या भूमिका केल्या सिंहासन, जैत रे जैत, एक होता विदूषक, चोरीचा मामला, शापित, पुढचं पाऊल, बिनकामाचा नवरा, फटाकडी, कळत नकळत, पिंजरा यातून त्यांनी खलनायकाची च नाही तर वेगवगळ्या भूमिका साकारल्या.

मराठीमध्ये त्यांनी 140 चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे तर काही बॉलिवुड चित्रपट ही त्यांनी केले आहेत. त्यांचा आयुष्यातील शेवटचा चित्रपट म्हणजे “गोष्ट छोटी डोंगराएवढी” हा होय. त्यानंतर निळू भाऊ हे चित्रपट सृष्टीमध्ये दिसेनासे झाले त्यांना अन्न नलिकेचा कॅन्सर झाला होता. अखेर 13 जुलै 2009 रोजी ते हे जग कायमचे सोडून गेले.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर