डबल मिनिंग डायलॉगचा बादशहा होते दादा कोंडके

खराखुरा विनोदाचा बादशहा...कमी शिकलेल्या या माणसाला देवाने प्रचंड प्रतीभा दिली होती. मुंबई मधील भोईवाडा विभागात चाळीत एका गरीब कुटूंबात जन्मलेल्या दादा कोंडकेंनी राष्ट्रसेवादलातून रंगमंचावर वावरायला सुरूवात केली. राष्ट्रसेवादल म्हणजे उच्चभ्रू उच्चवर्णीयांचा राबता असलेली संस्था. तीथे कमी शिकलेले, येडेगबाळे तीन तरुण एकत्र आले...नीळू फुले, राम नगरकर आणि दादा कोंडके. या तीघांनी राष्ट्रसेवादलाला कीर्तीमान बनवल. इतकं की या तीघांसाठी पु.ल. देशपांडेंनी एक लोकनाट्यसुध्दा लीहीलं. दादा राष्ट्रसेवादलातून बाहेर पडले आणि त्यांनी जनता कला पथक स्थापन केलं. याच पथकाद्वारे वसंत सबनीस यांच लोकनाट्य "विच्छा माझी पुरी करा" दादांनी रंगमंचावर आणल आणि मराठी रंगभूमीवर इतिहास घडला. पुढे चित्रपटसृष्टीत जाऊन दादांनी काय-काय आणि कीती-कीती रेकॉर्ड मोडले हे सर्वांनाच माहीत आहे. अचूक टायमींगचा बादशहा, उत्कृष्ट गीतकार, सामान्य जनतेची करमणूकीची नाडी अचूक ओळखणारा दोहेरी अर्थी संवादाचा असा बादशहा पुन्हा होणे नाही.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर