मॉडल यावर मिर्ज़ाचा पहिला म्यूजिक वीडियो हबीबी

मॉडल यावर मिर्ज़ा आणि इंटरनेशनल मॉडल जॉर्जिया एंड्रिआना एकत्र म्यूजिक वीडियोत दिसणार 

आता ते दिवस गए, जेव्हा मॉडल फक्त फैशन शो मध्ये वॉक करत होते. सध्यातर मॉडल सिनेमांतून काम करतात,  म्यूजिक वीडियोत झळकत आहेत. असाच एक सुपरमॉडल आहे यावर मिर्ज़ा, जो आपला पहिला म्यूजिक वीडियो करत आहे ज्याचे नाव आहे हबीबी. मध्य प्रदेशातील एका छोट्याशा शहरात राहणारा यावर मिर्ज़ा म्हणतो कि माझे शिक्षणात काही मन लागत नव्हते, मला फक्त मॉडलिंग मध्ये मजा येते. जेव्हा मी मुंबईला आलो तेव्हा मला वाटले कि एक-दोन महिन्यात टीवी सीरियल मध्ये काम मिळेल, परंतु असे काही झाले नाही. मी ऑडिशन दिले आणि त्याचबरोबर आपल्या बॉडीवर लक्ष्य केंद्रीत केले. त्यानंतर मी मुंबईत मॉडलिंग सुरु केली. मी सर्वात पहिली टाटा डोकोमोची एड केली व नंतर एका शर्टसाठी प्रिंट शूट केले. त्यानंतर मला भरपूर एड मिळू लागल्या. त्याचबरोबर मला लिबासचे रियाज़ आणि रेशमा गांगजी यांनी आपल्या ब्रांडसाठी मॉडल साइन केले, त्यामुळे मला ओळख मिळू लागली. नुकत्याच झालेल्या बॉम्बे टाइम्स फैशन वीक मध्ये वॉक केला. मी आता पहिला म्यूजिक वीडियो साइन केला आहे हबीबी, ज्याचे संपूर्ण चित्रिकरण दुबईत होणार आहे. हया वीडियोचे निर्माण टी वाई एफ प्रोडक्शंस करत आहे आणि ह्या दिग्दर्शक आहे सुप्रसिद्ध अमन प्रजापत. हे गाणं स्वरबद्ध केले आहे नक्काश अज़ीज़ ने आणि संगीत दिले आहे कौसर जमोत ने. ह्या वीडियोत इंटरनेशनल मॉडल जॉर्जिया एंड्रिआना दिसणार आहे, अरबाज़ ख़ानची गर्लफ्रेंड आहे. रुचिका महेश्वरी ह्या सिंगल सांगची इ पी आणि सह-निर्माती आहे. कोरोना वायरसमुळे शूटिंग एप्रिल महिन्यात होणार आहे आणि मे महिन्यात रिलीज होणार.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर