१५ वर्षापूर्वी झालेल्या पिकनिकच्या आठवणी - PRO Ganesh Gargote, Anup Dali, Shankar Marathe, Daya Sonde & others

रम्य त्या जुन्या आठवणी. हया फोटोच्या माध्यमाने जागृत झाल्या. मराठी फिल्म इंडस्ट्रीचे पीआरओ गणेश गारगोटे, पत्रकार अनुप दली, शंकर मराठे व दया सोंडे हया फोटोत दिसत आहे.
साधारण १५ वर्षापूर्वी PRO गणेश सर्व पत्रकारांना घेऊन एका रमणिय और मनमोहक रिसोर्टमध्ये पिकनिकसाठी घेऊन गेला होता. सर्व पत्रकारांनी दोन दिवस भरपूर धम्माल-मस्ती केली. (आता रिसोर्टचे नेमके नाव आठवत नाही, परंतु ही न्यूज पाहिल्यावर काही पत्रकारांना नक्की नाव लक्षात येईल)
तर जाणून घेऊया कशी झाली पिकनिक -- शनिवारी सायंकाळी दादर येथील प्रीतम होटल पासुन बसने सर्व मराठी पत्रकारांचा समूह पिकनिक साठी निघाला. रात्री रिसोर्टवर पोहचल्यावर गरमागरम चहा-पाणी व नाष्टा केल्यानंतर रात्री जंगलात कलरफूल बैन्ड शोधण्याचा खेळ सर्वांनी मनसोक्त खेळला. त्यानंतर सर्वानी गरमा-गरम डिनरचा आस्वाद घेतला. सर्व पत्रकारांनी आपला रोजच्या कामाचा भार विसरून रात्री भरपूर धम्माल केली.
दुस-या दिवशी सकाळची न्याहरी आटोपल्यानतंर काही गेम खेळले व कारंज्याखाली ओलेचिंब होण्याचा आनंद देखील घेतला. तोच हा फोटो आहे, जो दया सोंडेने शोधून काढला व इतक्या वर्षांनी शेयर केला.
Thanks to Daya Sonde ...,

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर