अथक संशोधनातून "पुण्यश्लोक अहिल्यादेवी" हा चित्रपट लवकरच आकार घेणार

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी' चित्रपट संहिता लेखन संशोधन समिती स्थापन!

डॉ. मुरहरी केळे यांच्या मार्गदर्शनाखाली २० मान्यवर लेखक, प्राध्यापक साहित्यिक संशोधन करणार!
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून संशोधन कार्याला प्रारंभ!

कोणताही चित्रपट हा फक्त आणि फक्त त्याच्या सर्वोत्कृष्ठ लेखन साहित्यामुळेच दर्जेदार होतो. सशक्त कथा, पटकथा, संवाद, गीते असलेल्या कलाकृतींना प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देतात. "पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा" इतिहासकालीन जीवनपट अधिक सक्षम, व्यापक व भव्यपणे सादर करता यावा, लेखन कलेतील त्रुटी टाळून उत्कंठावर्धक तसेच भक्कम पटकथेद्वारे "पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा" दुर्लक्षित इतिहास जनतेला माहित व्हावा यासाठी निर्माते बाळासाहेब कर्नवर पाटील आणि दिग्दर्शक दिलीप भोसले यांनी डॉ. मुरहरी केळे यांच्या मार्गदर्शनाखाली खास संशोधनासाठी २० मान्यवर तज्ज्ञ लेखक - साहित्यिकांची फौज उभी केली आहे.

"पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा" दुर्लक्षित इतिहास शोधणे हे एक दिव्य असून ते अचूकपणे शोधण्यासाठी या विषयातील अनुभवी निष्णात बुद्धिजीवी साहित्यिक,  प्राध्यापक यांची निवड करणे साधे काम नव्हे हे लक्षात घेऊन निर्माते बाळासाहेब कर्नवर पाटील आणि दिग्दर्शक दिलीप भोसले यांनी या विषयातील तज्ज्ञ डॉ. मुरहरी सोपानराव केळे यांनी निवड करून बाजी मारली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जीवन कार्यावर विपुल लेखन करणारे डॉ. केळे सूक्ष्म निरीक्षणातून आणि २० मान्यवर प्राध्यापक, लेखक, साहित्यिक संशोधन करणार आहेत. त्यांच्या अथक संशोधनातून "पुण्यश्लोक अहिल्यादेवी" हा चित्रपट लवकरच आकार घेणार आहे.

डॉ. मुरहरी केळे यांच्या सोबत या टीममध्ये डॉ. महेश खरात (मराठी विभाग प्रमुख  विनायकराव पाटील महाविद्यालय, वैजापूर), डॉ. रामकीशन दहिफळे (महिला महाविद्यालय,औरंगाबाद), दाजी कोळेकर (लोकसंस्कृती अभ्यासक, नवी मुंबई), गोविंद काळे (साहित्यक - कवी, सोलापूर), संपादक लेखक प्राध्यापक गणेश नामदेव हाके(लातुर), सूर्यकांत बारगळ उर्फ अण्णा साहेब  जहागिरदार( तळोदा इंदोर), प्रा. मुकुंद वलेकर, डॉ. महेश खरात, डॉ. किशन माने, डॉ. देविदास पोटे, डॉ. अरुण गावडे,  डॉ. सूर्यकांत कडकणे, डॉ. विवेक केळे, सुनील गणेश मटकर, लक्ष्मण मोरे, गोविंद काळे (सोलापूर),  बापूसाहेब शिंदे (नाशिक), माधवी संजय शिंदे (नाशिक), निहारिका खोंदले, योगेश खैरनार, अभिनेता समीर विजयन यांचा प्रामुख्याने समावेश आहे. 

Comments

सर्वांचे मनापासून अभिनंदन

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

LESBIAN SHOOT, A CONCEPT BY SHAAN PHOTOGRAPHY WITH MODEL/ACTRESS YASMEEN KHAN AND NATHASSHA SIKKA