स्वप्नील-मुक्ताचा नवा सिनेमा मंगलाष्टकं वन्स मोअर
मुंबई-पुणे-मुंबई व एका लग्नाची दुसरी गोष्ट ह्या दोन चित्रपटांत काम केल्यानंतर स्वप्नील जोशी व मुक्ता आता पुन्हा एक वेळ एकत्र काम करत आहे मंगलाष्टकं वन्स मोअर ह्या नव्या चित्रटात. ह्या चित्रपटाचे शूटिंग सध्या पुण्यामध्ये जोरात सुरु आहे. चित्रपटाची वन लाइन स्टोरी लाइन अशी आहे कि नाती तुटायला लागली म्हणून फेकू नका ती नव्यानं अपडेट करा.
चित्रपट मंगलाष्टकं वन्स मोअर च्या निर्मात्या तेलगु सुपरस्टार पवन कल्याण यांच्या पत्नी रेणू देसाई आहेत. ह्या चित्रपटातील मुख्य कलाकार स्वप्नील जोशी व मुक्ता, हेमंत ढोमे, सई ताम्हणकर, कादंबरी कदम व इतर आहेत. हा चित्रपट सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
Comments