मराठी निर्मात्यांचा आवडता अभिनेता भरत जाधव



मराठी चित्रपटसृष्टीत फारच कमी कलाकार निर्मात्यांना आपल्या परीने मदत करतात. असाच एक गुणी कलावंत आहे भरत जाधव. आता बघा ना... शालिन आटर्स प्रॉडक्शनच्या बैनर खाली तयार होत असलेला नवा चित्रपट आता माझी हटली ची नुकतीच मे महीन्यात राजस्थान मधील भरतपूर येथे पार पडली. त्यावेळी तेथील तापमान ४२-४४ डिग्री इतके होते व भरत जाधव ने कोणतेही आडेवेडे न घेता मन मोकळ्या पणाने चित्रिकरण पूर्ण केले.
 
ह्या चित्रपटात भरत जाधव एका रिक्षा ड्राइव्हरची भूमिका करीत असून तो करोडपती श्रीमंत मुलगी नेहाच्या प्रेमात पडला आहे. या प्रेमासाठी भरत जाधवला काय काय करावे लागते हे या चित्रपटात विनोदी व मनोरंजकतेने दाखविण्याचा प्रयत्न केला गेला आहे. 

आता माझी हटली मधील मुख्य कलाकार भरत जाधव आणि नवतारका रुचिता जाधव आहे. निर्माते शालिन सिंग व आदित्य नारायण सिंग तर महेंद्र देवळेकर चित्रपटाचे डायरेक्टर आहेत.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर