अलका कुबल-अरुण नलावडे चा नवा सिनेमा माझी शाळा

डायरेक्टर शांतनू अनंत तांबे यांनी 'माझी शाळा' मधून शेतकर्‍यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न उपस्थित केला आहे. आजही त्यांना शिक्षणासारख्या मूलभूत हक्कांसाठी करावा लागणारा संघर्ष पडद्यावर दाखविण्याचा एक आगळा-वेगळा प्रयत्न केला आहे.

चित्रपट 'माझी शाळा' ची कथा रामचंद्र गणपत तुळसकर ऊर्फ राम या शेतकर्‍याच्या मुलाभोवती गुंफण्यात आली आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत १५ किलो मीटर अंतरावर असलेल्या शाळेत जाऊन शिक्षण घेणार्‍या रामची कथा प्रेरणादाई ठरणारी आहे. गावात शाळा नसताना शिक्षण घेऊन मोठे झाल्यावर स्वत:ची शाळा काढून शिक्षणाचा प्रकाश सर्वदूर पोहोचवण्याचे स्वप्न पाहणार्‍या रामला किती संघर्षकरावा लागतो याची गाथा म्हणजे 'माझी शाळा' हा सिनेमा. दिग्दर्शनासोबत माझी शाळा ची कथा-पटकथा-संवादलेखन शांतनू तांबे यांनीच केले आहे.

चित्रपटातील मुख्य कलाकार अरुण नलावडे, अलका कुबल-आठल्ये, जयंत सावरकर, देवेंद्र दोडके, दीप ज्योती, अशोक पावडे, बबन जोशी, संचित यादव, पूर्णिमा व्हावळ आणि बालकलाकार आकाश वाघमोडे आहेत.



Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर