योद्धा’ १४ जूनपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार

शहरांचा पसारा वाढत गेला आणि त्यांनी गावे गिंळंकृत केली. गावाची सामाजिक रचना, संस्कृती, बरोबर गावातल्या शांततेने शहरीकरणासाठी आहुती दिली. शेतात राबराब राबुनही दोन वेळचं अन्न न मिळवु शकणारे ‘गुंठा मंत्री’ होऊन चैन करून लागले. त्यांच्या शेतात मजुरी करणाऱ्यांच्या हातच काम गेलं. पोट भरण्यासाठी गुन्हेगारी शिवाय पर्याय उरला नाही गाव बकाल होऊ लागली. गावातील गुंडांनी याचा फायदा उचलला व गुन्हेगारीच थैमान गावात घालायला सुरवात केली.
याच गावात संस्कृती, संस्काराची कास धरणार, गावावर जीवापाड प्रेम करणार एक कुटूंब आहे. त्या कुटूंब प्रमुखाला गरीबांचा कनवळा भोवतो. त्याला प्राण गमवावा लागतो. पण त्यांच्याच संस्कारातून वाढलेला त्यांचा मुलगा शिवा गुन्हेगारी व्यवस्थे विरोधात बंड पुकारतो. नक्षल्यांना कंठस्थान घालणारा पोलिस अधिकारी शिवा कसे या गावातील गुंडांशी या भ्रष्ट समाज व्यवस्थेशी कसा लढतो. या युद्धात कोणचा विजय होतो, कोणाचा पराभव होतो. कोण ठरतो जिगरबाज योद्धा हे आपल्याला चित्रपट पाहवयास मिळेल.
या चित्रपटात मुख्य भूमिकेत सौरभ गोखले, नागेश भोसले, सुनील गोडबोले, अन्वय बेंद्रे, प्रिया बेर्डे, शर्मिष्टा राउत, देवेंद्र भगत, शिवराज वाळवेकर, राजशेखरसिंग तर बालकलाकार अथर्व कर्वे, पूर्वा बर्वे यांचा अभिनय आपणास पाहवयास मिळेल. चित्रपटाची कथा - पटकथा एम.के. धुमाळ, संवाद - शिव कदम, गीते – ना. धो. महानोर, शंतनु घुले, नचिकेत तर या चित्रपटाचे संगीतकार - ओंकार केळकर, छायाचित्रण - चंद्रशेखर अय्यर, कला - संदीप इनामके, संकनल – संतोष गोठोस्कर यांचे आहे.
'योद्धा' हा चित्रपट १४ जूनच्या संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित करण्यात येणार आहे. असे चित्रपटाच्या निर्मात्यांनी सांगितले.
Comments