आता माझी हटली ची नायिका रुचिता जाधव
पुण्यातील सुशिक्षित व
जनसेवकांच्या घरातील रुचीता जाधव ही चित्रपटसृष्टीत दाखल झाली आहे. आई नगरसेविका
आणि वडील उद्योगपती असलेल्या घराचा चित्रपटाशी-काही एक संबंध नाही. कॉलेजमध्ये
शिकत असताना मॉडेलिंगकडे वळले. मॉडेलिंग करता-करता अमोल माचोची जाहिरात मिळाली. त्यातुनच
पुढे वृंदावन, लेक लाडकी, माझीया प्रियेला
प्रित कळेना, कालाय तस्मेय नमा, विर शिवाजी
इत्यादी मालिका मिळाल्या. मालिका करता-करता चित्रपटाची ऑफर आली आणि रूचिता चित्रपटसृष्टीत
दाखल झाली. अरे दादा पूरे, फेकमफाक, वेलकम टू जंगल, वात्सल्य, भूताचा
हनीमून आणि आता माझी हटली असे चित्रपट तिच्याकडे आहेत. मुंबईच्या गोरेगांव स्थित फिल्मसिटी
मध्ये आता माझी हटली या चित्रपटाच्या सेटवर रूचिता बरोबर संवाद साधला.
० चित्रपट
आता माझी हटली तुम्हाला कसा काय मिळाला ?
मी भूताचा हनिमून हा चित्रपट भरत जाधव सोबत करत आहे. भरत जाधव यांना साईन
करण्यासाठी या चित्रपटाचे निर्माता व दिग्दर्शक सेटव आले होते. त्यांनी माझे भरत जाधव
सोबत काम पाहिले आणि आता माझी हटली या चित्रपटासाठी विचारणा केली. मी त्यातील माझी
भूमिका ऐकून घेतल्यावर काम करण्यासाठी लगेच होकार दिला.
० आता माझी हटली मधील तुमची भूमिका कशा प्रकारची आहे
?
या चित्रपटात मी नेहा नावाचे
कैरेक्टर करत आहे. नेहा पैसेवाल्या घरातील मुलगी असुन थोडीशी मग्रुर आणि मनमुडी आहे.
तिला पुरुषांचा भयंकर तिटकारा असतो. ती पुरुषांचा तिरस्कार करत असते. शिवाय लग्नांच्या
विरोधात असते. लग्नांच्या हट्टापाई तिला काय-काय करावे लागते याचे मनोरंजक चित्रण चित्रपट
आता माझी हटली मध्ये करण्यात आले आहे.
० राजस्थानच्या चित्रीकरणाचा अनुभव कसा होता ?
साधारणता एप्रिल महिन्यात आपल्याकडे
उन्हाळा कमी असतो. परंतु तेथे तिव्र आणि कडक उन्हाळा. तापमान हे ४५ डिग्री च्या आसपास
असते. याची सवय नसल्यामुळे अनेक अडचणी आल्या. परंतु त्यावर मात करत ठरल्याप्रमाणे चित्रिकरण
पार पडले. एकूणच वेगळा अनुभव आला.
० भरत जाधव
सोबत काम करण्याचा अनुभव कसा आहे ?
खूपच चांगला अनुभव होता. अशा
प्रकारच्या गर्मीची भरतलाही सवय नाही. परंतु आम्ही एकमेंकाच्या सहकार्याने चित्रिकरण
पार पाडले. भरतकडून शिकायला भरपूर मिळाले. तो कामामध्ये एकदम पंक्चुएट आहे. शिवाय सहकलाकाराला
सांभाळून घेण्याची कला त्याला अवगत आहे. त्यामुळे कुठे ही अडचण आली नाही. शिवाय भरत
सोबत मी चार ते पाच चित्रपट करत असुन त्यामुळे आमची केमेस्ट्री जुळली आहे.
० या राजस्थानच्या
चित्रिकरणातील आठवणीत राहणारा एखादा सीन कोणता ?
एक सीन होता. तो म्हणजे भरत
मला स्विमींग पूल मध्ये ढकलतो व माझा श्वास गुदमरतो. परंतु इथे माझा श्वास हा खरोखरच
गुदमरत होता व मला स्विमींग पूल मधुन बाहेर काढण्यात आहे. हा सिन माझ्या जिवावर बेतला
असता त्यामुळे हा सीन आयुष्यभर माझ्या लक्षात राहणार आहे.
० दिग्दर्शक
महेंद्र देवळेकर यांच्या विषयी काय सांगाल ?
महेंद्र देवळेकर हे एक गुणी
दिग्दर्शक आहेत. या चित्रपटासाठी ते खूप मेहनत घेत आहेत. शिवाय कलाकारांकडून काम कसे
काढुन घ्यायचे यांची त्यांना माहिती असल्यामुळे सेटवर नेहमीच चांगले वातावरण होते.
प्रोडक्शन कंपनीने ही बाहेरगावी शूटिंग करताना सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या. एक
प्रकारे संपूर्ण युनिट ने राजस्थानातील चित्रीकरण म्हणजे सहलीचा अनुभव घेतल्यासारखे
वाटले.
० चित्रपट
सृष्टीतील कोणत्या नायिकेचे काम तुम्हाला प्रभावित करते ?
मला अनेक नायिका आवडतात. परंतु त्यातल्या ऐश्वर्या राय आणि माधुरी दिक्षित या खूपच
आवडतात. त्यांचे काम व त्यांची की ग्लैमरस छवी यांच्या मोहात कोण पडणार नाही. माधुरीचे
नृत्य आणि ऐश्वर्याचे ग्लैमरस रूप हे मला नेहमीच प्रोत्साहीत करते.
० तुमचा ठरवून
ठेवलेला ड्रिम रोल काय आहे ?
मी आता कुठे काम करु लागली
आहे. ड्रिम रोल एवढ्यात सांगता येणार नाही. परंतु मला वेगवेगळे व आव्हानात्मक भूमिका
साकारायला आवडेल.
Comments