शिवसेना चित्रपट सेनेमुळे कलाकारांसाठी मढ जेठी, फिल्मसिटी ते दादर बस सेवा लवकरच

मढ आयलैंड, फिल्मसिटी या निर्जन स्थळांवरून शहरात येण्यासाठी दुसरी कोणतीही सुविधा नसल्याने हे कलावंत कसे बसे शहर गाठतात. किंवा तिथेच रात्र काढता. कलावंताच्या या कथेची दखल शिवसेना चित्रपट सेनेचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी घेतली. आणि या कलावंत ना रात्री घरी घरी सुखरुप पोहचता यावे या साठी त्यांनी मढ जेठी, फिल्मसिटी येथून दादर पर्यंत बेस्ट ची बस सेवा सुरु करावी अशी मागणी केली. त्यांच्या मार्गदर्शना खाली शिवसेना चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष सुबोध भावे, दिगंबर नाईक यांच्या सह कार्यकर्त्यांनी बेस्ट भवन येथे बेस्ट समिती चे अध्यक्ष संजय अंबोले यांची भेट घेउन त्यांना निवेदन दिले होते.
शिवसेना चित्रपट सेनेचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी या मागणीचा पाठपुरावा केला असून या मागणीला बेस्ट समितीचे अध्यक्ष संजय अंबोले यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे येत्या जुलैच्या पहिल्याच आठवड्यात अशी बस सेवा सुरु होणार आहे.
Comments