एनसीपीए मराठी विशेष – ‘अस्तित्व’ प्रस्तुत झीम खेळणारी पोरं
‘अस्तित्व’ या मुंबईतल्या प्रयोगशील नाट्यसंस्थेने गेल्या वर्षभरात नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्टस् अर्थात एनसीपीए च्या सहयोगाने नाट्यविषयक अनेक उपक्रम राबवले असून त्यात राजन भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रात्यक्षिकासहित घेण्यात आलेली आणि सर्वात जास्त प्रतिसाद मिळालेली नेपथ्य कार्यशाळा,मराठी विशेषया उपक्रमांतर्गत अभिनय कल्याणच्या निर्मितीमध्ये सादर झालेल्या चं.प्र.देशपांडेंच्या ए आपण चहा घ्यायचा का ? या नाटकाला मिळालेला उत्तम प्रतिसाद, यामुळे हुरूप वाढलेल्या अस्तित्वने एनसीपीए मराठी विशेष साठी एक नवे नाटक रंगभूमीवर आणले आहे.
फेब्रुवारी महिन्यात ‘अस्तित्व’च्या पारंगत सन्मान या एकांकिका गौरव सोहळ्यात अभिनय, कल्याण या संस्थेने संजय कृष्णाजी पाटील यांच्या " लेझीम खेळणारी पोरं " या काव्य संग्रहावर आधारित, एका दीर्घ कवितेचे अप्रतिम रंगमंचीय सादरीकरण अभिजित झुंझारराव यांच्या दिग्दर्शनाखाली सादर केले होते. त्याचे प्रसार माध्यमांनीही विशेष कौतुक केले होते.त्यातून प्रेरणा घेत अस्तित्वचे संचालक रवी मिश्रा यांनी यातून एक दीड तासाचा नाट्यानुभव निर्माण करण्याचा प्रस्ताव अभिनय, कल्याण पुढे मांडला,संजय कृष्णाजी पाटील यांनीही निवडक कविता उपलब्ध करून दिल्या,त्यातून अभिजित झुंझाररावच्या दिग्दर्शनात नाटक, कविता, नृत्य आणि संगीत यांचा मिलाफ असलेला एक भन्नाट नाट्याविष्कार साकारण्यात आला आहे.
एनसीपीए मराठी विशेषमध्ये येत्या गुरुवारी २० जूनला संध्याकाळी साडे सहा वाजता एक्स्परिमेंटल थिएटरला हा प्रयोग होणार आहे.
अभिजित झुंझारराव,नेहा अष्टपुत्रे,विराज झुंझारराव,सोनाली मगर आणि सहकलावंताच्या साथीने सादर होणार हा प्रयोग नाट्यरसिकांसाठी एक निश्चितच वेगळा अनुभव असेल.
अधिक माहितीसाठी - रवी मिश्रा – संचालक अस्तिव – ९८२१०४४८६२ अभिजित झुंजारराव – दिग्दर्शक- ९८२०९८१३२८
Comments