इरफान खान यांच्या निधनाने बॉलिवुडसह राजकीय क्षेत्रातदेखील शोककळा पसरली

बॉलिवूड अभिनेता इरफान खान यांनी वयाच्या ५४ व्या वर्षी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. इरफान खान यांला न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर नावाचा आजार होता. त्यांच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूडसह सर्वत्र शोककळा पसरली आहे. राजकीय क्षेत्रातून देखील त्यांच्या निधनानंतर भावूक प्रतिक्रिया आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, कॉंग्रेस नेते राहुल गांधी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह दिग्गज नेत्यांनी इरफान खान यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरुन इरफानला श्रद्धांजली अर्पण केली -- 'इरफान खानच्या निधनाने फिल्म इंडस्ट्रीचे मोठे नुकसान झाले आहे. ईश्वर त्याच्या आत्म्यास शांती देवो.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनेता इरफान खान यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात - इरफान खान यांच्यात गुणी अभिनेत्याबरोबरच उत्तम व्यक्तिमत्व सामावले होते. भारतीय चित्रपटसृष्टी ते हॉलिवूड हा त्यांचा प्रवास होतकरू कलावंतांना एक वस्तूपाठ ठरेल असाच आहे. दुर्दैवाने काळाने त्यांना ओढून नेले आणि अभिनयाचा त्यांचा प्रवास थांबला. त्यांना मनःपूर्वक श्रद्धांजली.

सिनेसृष्टीतील प्रवास - इरफान खान यांचा जन्म ७ जानेवारी १९६७ मध्ये राजस्थानमधील जयपूर येथे झाला. इरफान खान हे एम.ए. करत असताना त्यांना दिल्लीतील ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ची शिष्यवृत्ती मिळाली. त्यानंतर त्यांनी मुंबईत येण्याचा निर्णय घेतला. चाणक्य या हिंदी मालिकेद्वारे त्यांनी सिनेसृष्टीत पदापर्ण केलं. त्यानंतर १९९४ मध्ये द ग्रेट मराठा या मालिकेत त्यांना रोहिल्ला सरदारची भूमिका साकारली होती. त्यानंतर मीरा नायर यांचा चित्रपट ‘सलाम बॉम्बे’ मधून त्यांनी बॉलीवूडमध्ये आपल्या करियरला सुरुवात केली. यासाठी ऑस्कर पुरस्कारासाठीही त्याचं नाव नॉमिनेट करण्यात आले होते.

‘पद्मश्री’ पुरस्कार -- लाइफ इन अ मेट्रो, पानसिंग तोमर, द लंचबॉक्स, हैदर, गुंडे, पिकू, तलवार, कारवां, हिंदी मीडियम यांसारख्या चित्रपटांमध्ये इरफान खान यांनी दमदार भूमिका साकारल्या होत्या. बॉलिवूडसोबतच त्यांनी हॉलिवूडमध्येही छाप सोडली. कलाक्षेत्रातील अभूतपूर्व कामगिरीसाठी २०११ मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता.

अंतिम प्रदर्शित झालेला चित्रपट - अंग्रेजी मिडियम

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर