फिल्मी गाण्यांवर कार्यक्रम करणा-या सर्व कलाकारांवर आली उपासमारीची पाळी
भारत देशात कोरोनामुळे सर्व राज्यात लॉकडाऊन-३ सुरु आहे व आता तर जवळ-जवळ २० मार्च पासून ५० दिवस झाले आहे आणि त्यामुळे खासकरून मुंबईनगरीत फिल्मी गाण्यांवर कार्यक्रम करणा-या सर्व कलाकारांवर उपासमारीची पाळी आली आहे. स्टेज शो, ऑर्केस्ट्रा, बार आणि पब मध्ये गाणारे सिंगर, लोकसंगीतावर आधारित प्रोग्राम व इतर कार्यक्रमांतून काम करणा-या कलाकारांचे जीवन जगणे मुश्किल झाले आहे, कारण लॉकडाऊनमुळे रोजची मिळकत बंद झाली आहे व जवळची जी काही पूंजी होती, ती देखील संपली आहे. लॉकडाऊन कधी संपेल ह्याची काही चिन्हे दिसत नाही.
Comments