चित्रिकरण सुरू करण्याचा विचार - उध्दव ठाकरे
कोरोनामुळे देशात लॉकडाऊन सुरु झाला तेव्हापासून फिल्म इंडस्ट्री पूर्णपणे ठप्प झाली आहे व आता देशात लॉकडाऊन-४ सुरु आहे तर सिनेमांच्या व सीरियलच्या चित्रिकरणाला सुरुवात कधी पासून करायची, ह्याबद्दल सिनेसृष्टीतील निर्माता-दिग्दर्शक-कलाकार व अन्य वरिष्ठ मान्यवरांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारले असता, उध्दव ठाकरे म्हणाले कि जून पासून पावसाळा सुरु होत आहे व हळू-हळू महाराष्ट्रात उद्योगधंदे सुरु करण्याचा प्रयत्न सुरु आहे, तरी ग्रीन झोन मध्ये सोशल डिस्ट्रीन्सीग पाळून काम करण्याचा मानस असेल तर नक्कीच चित्रिकरण सुरु करण्याचा विचार केला जाईल. पावसाळ्यापूर्वी अशी काही चित्रीकरणे शक्य होतील का ते पाहण्यास मुख्यमंत्र्यांनी सांस्कृतिक कार्य विभाग व निर्मात्यांना सांगितले. नाट्य आणि चित्रपटगृहे ही सार्वजनिकरीत्या एकत्र येण्याची ठिकाणे असल्याने तिथे लगेच काही परवानगी देता येईल, असे वाटत नसल्याचेही त्यांनी सांगितले. चित्रपटनगरीतील सध्या ज्यांचे सेट्स उभे आहेत त्यांना भाडे सवलत, लोककला, तमाशा कलावंत यांना जगविणे यासंदर्भात निश्चितपणे विचार केला जाईल, असेही ते म्हणाले.
Comments