'पांच कदम, करोना मुक्त जीवन' टाटा ट्रस्टचे महाराष्ट्रात आरोग्य अभियानात कलाकारांनी साथ दिली

टाटा ट्रस्ट्सने संपूर्ण राज्यभरात एक आरोग्य अभियान सुरु केले आहे.  कोविड-१९ चा फैलाव रोखण्यासाठी भारत सरकारने आखून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार आरोग्य उपाययोजनांची अंमलबजावणी केली जावी यासाठी संपूर्ण समाजाला प्रोत्साहन देणे हा या अभियानाचा उद्देश आहे.  ३१ मार्चपासून सुरु झालेले हे अभियान राज्यभरातील २१ लाख लोकांपर्यंत पोहोचले असण्याची अपेक्षा आहे.

'पांच कदम, करोना मुक्त जीवन' हे या अभियानाचे नाव असून यामध्ये व्हिडिओ संदेश, छोटे ऍनिमेशन व्हिडिओज् आणि इन्फोग्राफिक्सपासून ऑडिओ संदेश आणि एसएमएसवर आधारित संदेश यांचा समावेश करण्यात आला आहे. कोणत्याही संघटनेला इच्छा असल्यास या अभियानाचा वापर करता यावा यासाठी टाटा ट्रस्टने सोशल मीडियामार्फत जवळपास ३०० व्हिडिओज् आणि ऑडिओ संदेश सार्वजनिकरित्या उपलब्ध करवून दिले आहेत. हे संदेश मराठीसह अनेक वेगवेगळ्या भाषांमध्ये तयार करण्यात आले आहेत.

नाना पाटेकर, सोनाली कुलकर्णी, मृणाल कुलकर्णी, प्रसाद ओक, भारत गणेशपुरे, सोनाली कुलकर्णी, डॉ. अमोल कोल्हे, गायत्री दातार, अंकुर वाढावे, शशांक उदापूरकर, देवाजी टोफू, शिव ठाकरे, अतुल कुलकर्णी यासारख्या अनेक नामवंत सेलिब्रेटीजनी हे व्हिडिओ आणि ऑडिओ तयार करण्यासाठी सहयोग दिला आहे.

टाटा ट्रस्टने ८५ मास्टर ट्रेनर्स तैनात केले असून ज्यांनी ६२८ ग्राम स्वयंसेवकांना प्रशिक्षण देऊन या अभियानाचा संदेश समाजातील तळागाळापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली आहे. टाटा ट्रस्टचे विविध कार्यक्रम, स्वयंसेवक, ट्रस्टच्या विविध सहयोगी संघटना यांचे वर्तमान नेटवर्क, स्थानिक रेडिओ, गावागावातील सार्वजनिक संदेश यंत्रणा आणि विविध इंटरनेट व संचार तंत्रज्ञानाचा वापर करून हे अभियान आजवर महाराष्ट्रातील २१ लाख लोकांपर्यंत पोहोचले असण्याची अपेक्षा आहे.

अभियानामार्फत ज्या आरोग्यदायी सवयींना प्रोत्साहन देण्यात आले आहे त्या पुढीलप्रमाणे आहेत:

१. हात धुण्याची योग्य पद्धत
२. सोशल डिस्टंसिंग अर्थात एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखण्याचे महत्त्व
३. श्वसनाचे व्यायाम
४. योग्य स्रोतांपासून मिळणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवणे.
५. कोविड-१९ चे निदान लवकरात लवकर करणे.
६. आपापल्या मूळ गावी परतणाऱ्या स्थलांतरीत कर्मचाऱ्यांनी स्वतःला क्वारंटाईन करून घेण्याबाबत शिष्टाचार

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

LESBIAN SHOOT, A CONCEPT BY SHAAN PHOTOGRAPHY WITH MODEL/ACTRESS YASMEEN KHAN AND NATHASSHA SIKKA