फिल्म इंडस्ट्रीतील ‘ऋषी युग’ संपले

इरफान खान यांच्या दु:खद बातमीतुन कुणी सावरत नाही तोच ऋषी कपुर गेल्याची बातमी दुस-या दिवशी येऊन थडकली. कपुर खानदानातला उत्तम अभिनेत्यांच्या साखळीतला एक हिरा निखळला. चित्रपट ‘श्री ४२०’ मधील पावसातातून छत्री घेऊन जाणारा छोटासा चिंटू म्हणजेच ऋषि कपूर पहावयास मिळाला होता व त्यानंतर "मेरा नाम जोकर" पासुन पडद्यावर दिसायला सुरूवात करणा-या हया टिन-एजरने तारुण्यात प्रवेश करताच "बॉबी" मधून त्याने आपण लंबीरेसचा घोडा आहोत हे दाखवुन दिले होते. अभिनयावर तर त्याच प्रभुत्व होतच, पण डांसमधील त्याची सहजताही मन आकर्षुन घ्यायची. आपली हिरो पासुन सुरु झालेली इनींग तितक्याच ताकदीने त्याने व्हिलन म्हणुनही तितकीच आश्वासक गाजवली. जे मनात आहे ते बेबाक बोलुन टाकणारा, परिणामांची पर्वा न करणारा हा अभिनेता होता. ह्या जगाला अलविदा करताना ऋषी कपुर ने हसत-हसत निरोप घेतला व फिल्म इंडस्ट्रीतील ‘ऋषी युग’ संपले असे हसत मुखाने जाहिर केले.

कोरोनामुळे देशात लॉकडाऊनची परिस्थिती असताना ऋषि कपूरचा चाहतावर्ग कोणीही त्यांच्या अंतदर्शनास पोहचु शकत नव्हता, त्यावेळी सिनेमा ‘बॉबी’ मधील सुपरहिट गाणं आठवले -- अंदर से कोई बाहर न जा सके, बाहर से कोई अंदर न आ सके, सोचो कभी ऐसा हो तो क्या हो, सोचो कभी ऐसा हो तो क्या हो?

ऋषी कपूर यांनी जवळपास ९२ चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. सगळ्याच पिढ्यांमध्ये त्यांचा चाहतावर्ग आहे. ‘मेरा नाम जोकर’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता तर डेब्यू सिनेमा बॉबी होता. त्याचबरोबर सागर, दामिनी, दीवाना, नगीना, दो दुनी चार, कर्ज, प्रेमरोग, चांदनी,प्रेमगंथ, बोल राधा बोल, निगाहें, नसीब अपना अपना या चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या होत्या.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला -- ‘तो गेलाय.. ऋषी कपूर गेलाय.. आणि मी उध्वस्त झालोय’. अमिताभ बच्चन यांनी ऋषि कपूर सोबत नसीब, अमर अकबर एंथ्योनी, कूली, अजूबा, १०२ नॉट आउट  सारखे सुपरहिट सिनेमे केले आहेत. 

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

LESBIAN SHOOT, A CONCEPT BY SHAAN PHOTOGRAPHY WITH MODEL/ACTRESS YASMEEN KHAN AND NATHASSHA SIKKA