Rishi Kapoor no more
कालच्या इरफान खान यांच्या दु:खद बातमीतुन अजुन कुणी सावरल नाही तोच ऋषी कपुर गेल्याची बातमी येऊन थडकली. कपुर खानदानातला उत्तम अभिनेत्यांच्या साखळीतला एक हिरा आज नीखळला.." मेरा नाम जोकर " पासुन पडद्यावर दिसायला सुरवात करणार्या या टिन एजरने तारुण्यात प्रवेश करताच " बॉबी " मधून त्याने आपण लंबीरेसचा घोडा आहोत हे दाखवुन दिल होत. अभिनयावर तर त्याच प्रभुत्व होतच पण न्रुत्यातली त्याची सहजताही मन आकर्षुन घ्यायची. आपली हिरो पासुन सुरु झालेली इनींग तीतक्याच ताकदीने त्याने व्हिलन म्हणुनही तीतकीच आश्वासक गाजवली. जे मनात आहे ते बेबाक बोलुन टाकणारा,परिणामांची पर्वा न करणारा हा अभिनेता होता.
Comments