‘मिसेज इंडिया यूके 2018’ विजेती उर्वशी सालारिया चावला
‘मिसेज इंडिया यूके 2018’ विजेती उर्वशी सालारिया चावला द्वारा लास वेगास मध्ये मिसेज अर्थचा श्रीमती यूरेशिया अर्थचे प्रतिनिधित्व केले जाईल.
लंदन मध्ये काही महिन्यापूर्वी कलर्स टीवी व बैंड वर्क द्वारा आयोजित ‘मिसेज इंडिया यूके २०१८’ स्पर्धेत फाइनल मध्ये भारतीय सौंदर्य उद्योजक उर्वशी सालारिया चावला हिला श्रीमती इंडिया यूकेचा मुकुट बहाल केला होता, त्यामुळे आपल्या देशाला अभिमान वाटला होता. तिने अन्य यशा सोबत "बेस्ट कैटवॉक" आणि "ब्रांड एंबेसडर" चे उप-शीर्षक देखील जिंकले. उर्वशी ने मुकुट जिकंल्यानंतर सांगितले, ‘तसे पाहिले तर हा मुकुट फारच सुंदर आहे, परंतु हा काही जबाबदारी सोबत येतो आणि मी हा मुकुट फक्त माझ्या डोक्यावर परिधान करणार नाही, तर मनापासून परिधान करणार आहे. मी चिकाटी ने सर्व जबाबदा-या पूर्ण करणार आहे.’
शैक्षणिक पातळीवर उर्वशी पत्रकारितेत ग्रेजुएट आहे, व्यवसायने एक एयरलाइन, एक सौंदर्य ब्लॉगरच्या रुपात काम करत आहे आणि आता मेकअप उद्योगात एक यशस्वी उद्योजक आहे, जी भारतात दिल्लीत साक्षी व उर्वशी ब्यूटी स्टूडियोची मालकिन आहे आणि लंदन मध्ये एक सम्मानित एशियाई दुल्हन मेकअप कलाकार आहे. ती प्रकृति द्वारा पर्यावरणवादी देखील आहे, जी हवामानातील परिवर्तनाबद्दल प्रसार करण्याचे काम करत आहे.दिल्ली आणि लंदन मध्ये वृक्षारोपण चालवित आहे. ती डब्ल्यूडब्ल्यूएफ अर्थ ऑवर अभियान सारख्या पर्यावरण क्रियाकलाप मध्ये स्वयंसेवका सोबत जोडली गेलेली आहे. उर्वशीच्या मते, "उद्देश्या सोबत सौंदर्य" चा समज व्यक्त करणे आहे. उर्वशी आता श्रीमती यूरेशिया अर्थ च्या रूपात प्रतिनिधित्व करणार आहे आणि ह्या वर्षी जुन मध्ये श्रीमती अर्थ २०१८ पेजेंट साठी स्पर्धा करणार, जी संयुक्त राज्य अमेरिका मधील लास वेगास मध्ये आयोजित केली जाणार आहे.
उर्वशी चिकाटी ने हवामानातील परिवर्तनाच्या विरुद्द उभी राहुन आपल्या पृथ्वी मातेची काळजी करण्याचा दृढ संकल्प आहे. तिच्या मते आपण सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे आणि ह्याबद्दल जास्तच जास्त जागृत झाले पाहिजे कि आपण कशा प्रकारे पर्यावरणाची देखभाल करु शकतो आणि हे सर्व नविन प्रकारे सुरु होते, जसे कॉफीच्या कपाचा पुन्हा उपयोग करणे, दैनिक जीवनातील पर्यावरणासाठी अनुकूल वस्तुंचा उपयोग करणे, रीसाइक्लिंग आणि पुन्हा उपयोग करणे, कचरापेटीत कचरा टाकणे. तीने #iCareForEarth नावाची एक मोहिम सुरु केली आहे, जेथे कोणीही सोशल मीडिया वर फोटो पोस्ट करुन कोणत्याही क्रियाकलापाबद्दल किंवा कोणत्याही वस्तुंचा उपयोग करत आहे, ज्यांचा उपयोग ते आपल्या दैनदिन जीवनात करत आहे, त्यासाठी ह्या हैशटैग #iCareForEarth चा उपयोग करावा.
तिच्या मते सोशल मीडिया दुस-यांना प्रेरणादायक आणि प्रोत्साहित करण्याची महत्वपूर्ण भूमिका साकारत आहे आणि तीला हा मंच एका हिरव्या ग्रहासाठी काम करण्यासारखा वाटतो. ती म्हणते कि मी श्रीमती अर्थ पेजेंट सारख्या सम्मानित मंचाचा भाग बनले म्हणून भाग्यशाली आहे, तेथे मी जगातील बुद्धिमान महिलांना भेटेल, तेथे माझा मुख्य आदर्श स्वस्थ ग्रहासाठी काम करण्याचा आहे. मला ही संधी प्रदान केल्याबद्दल संपूर्ण टीम व आयोजकांची फारच आभारी आहे. मी आपल्या ग्रहासाठी पर्यावरणीय समस्यांबद्दल लढण्यासाठी एका मिशन वर आहे आणि मी सर्वांना #iCareForEarth ह्या मोहिमेत सहभागी होण्याची विनंती करत आहे, कारण मला वाटते कि आपल्या लहानश्या प्रयत्नांचा मोठा प्रभाव नक्कीच पडेल.
Comments