सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडियाने अजय भालवणकर यांची नेमणूक केली
सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया कंपनी लवकरच मराठी चॅनेल सुरु करणार आहे. त्याची तयारी म्हणून या कंपनीने अजय भालवणकर यांची बिझनेस हेडपदि नियुक्ति केली आहे. कंपनीचे प्रस्तावित मराठी चॅनेल जनरल एंटरटेन्मेंट गटातील म्हणजे सामान्य मनोरंजन चॅनेल असेल. अजय भालवणकर हे मागील दोन दशकापासून मीडिया आणि एंटरटेन्मेंट व्यवसायात आहेत.
त्याच्याकडे या उद्योगातील विविध क्षेत्रात काम करण्याचा अनुभव आहे. २०१४ पासून ते सोनी पिक्चर्स कंपनीसोबत काम करत आहेत. मराठी चॅनेलचे बिझनेस हेड पदावर नियुक्त होण्यापूर्वी ते सोनी एंटरटेन्मेंट टेलिव्हिजन मध्ये चीफ क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून कार्यरत होते. त्यांनी झी टिव्हीमध्येही हिंदी मनोरंजन विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहिले आहे.
एन.पी. सिंह, एमडी आणि सीईओ, सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया (एसपीएन): "सांस्कृतिक संकल्पनेशी निगडीत असलेल्या स्थानिक मराठी विषयासाठी दर्शकांची वाढती इच्छा आहे. या प्रेक्षकांना पूर्तता करून, एसपीएन आपल्या क्षेत्रीय पाऊलखुणाचा विस्तार करेल. अजय एक आकर्षक चॅनेल अनुभव वितरीत करण्यात महत्वाची भूमिका बजावेल. उद्योगाची व्यापक अनुभव आणि सखोल जाणीव असल्याने, मला विश्वास आहे की अजयच्या नेतृत्वाखाली एसपीएन मराठी मनोरंजन क्षेत्रात एक प्रभावी पदार्पण करेल."
Comments