मेघ मंडळ संस्थान ने ८ भारतीय चित्रकारांना राजा रवि वर्मा चित्रकार सम्मान देऊन सत्कार केला.


 राजस्थान येथील एनजीओ मेघ मंडल संस्थान ने आपला वार्षिक कार्यक्रम चैत्रंजली च्या चौथ्या संस्करणात मुंबईत जुहू स्थित इस्कॉन ऑडिटोरियम मध्ये ८ आठ प्रतिभाशाली चित्रकारांना पुरस्कार दिला.

विमलेश ब्रिजवाल यांच्या नेतृत्वाखाली एनजीओ, समाजाच्या उन्नतीसाठी आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील विकासाच्या संकल्पनेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रतिबद्ध आहे. मेघ मंडळ संस्थान वंचित मुले, त्यांचे कुंटुंब व समाजातील जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी कार्यरत आहे. जे कमी भाग्यवान आहेत, त्यांच्या उन्नतीसाठी योगदान देण्या व्यतिरिक्त, संस्थान भारतीय कला, संस्कृती आणि परंपराचे जतन करण्याचे कार्य करत आहे.


भारतीय कला इतिहासात सर्वात महान चित्रकारांपैकी राजा रवी वर्मा एक आहे. त्याच्या कलाकृतींनी देशभरात स्वीकृती प्राप्त केली आहे. भारतात हिंदू देवतांचे वर्णन आणि महाकाव्य आणि पुराणांमधील अनुकरण पूजा करण्यासाठी वापरले जातात.

ह्या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून हरियाणाचे गव्हर्नर प्राध्यापक श्री कप्तान सिंग सोलंकी यांची सन्माननीय उपस्थिती होती. त्याचबरोबर मेघ मंडल संस्थान चे सचिव विमलेश ब्रिजवाल यांच्या व्यतिरिक्त संसद सदस्य (शिवसेना) अरविंद सावंत, बॉलीवूड अभिनेता पंकज बेरी आणि बिजनेसमैन विजय कलंत्री यांचा समावेश आहे. पुरस्कार विजेते चित्रकार आहेत - शशी बने, शम्पा दास, सुहास निंबाळकर, संगीता गुप्ता, श्रीधर अय्यर, अनु नायक, जय जारोटिया आणि सिद्धार्थ.

हया कार्यक्रमात बोलताना मेघ मंडळ संस्थेचे सचिव श्रीमती विमलेश ब्रिजवाल म्हणाल्या की भारतीयांना एक समृद्ध इतिहास, संस्कृती आणि परंपरा आशीर्वादाच्या रुपात मिळाल्या आहेत, त्यामुळे आपण अद्वितीय बनलो आहोत. आम्ही हया पिढीच्या प्रतिभावान कलाकारांना प्रोत्साहित करणार आहोत, जे खरोखरच पात्र आहेत.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर