‘3 देव’ मधील कलाकार करण सिंग ग्रोवर, रवि दुबे आणि कुणाल रॉय कपूर यांनी डब्लूडब्लूई संडे धम्मालच्या शूटिंग मध्ये सलिल आचार्य यांच्या बरोबर धमाल केली.


डब्ल्यूडब्ल्यूई संडे धम्माल मध्ये सलिल आचार्य सोबत करण सिंग ग्रोवर, रवि दुबे आणि कुणाल रॉय कपूर हिंदी कॉमेडी चित्रपट  3 देव चे प्रमोशन करण्यासाठी गेले होते. डब्ल्यूडब्ल्यूई मध्ये त्यांनी फारच धम्माल-मस्तीत वेळ घालविला. करण सिंह ग्रोवर ने सांगितले कि डब्ल्यूडब्ल्यूई संडे धम्माल मध्ये सहभागी होणे माझ्यासाठी अविस्मरणिय क्षण होता. मला आठविते कि मी जेव्हा तरुण मुलगा होतो तेव्हा रॉ व स्मैकडाउन बघत असायचो आणि आज आम्ही सर्व कलाकार डब्ल्यूडब्ल्यूई मध्ये चित्रपट ३ देव चे प्रमोशन करण्यासाठी आलो आहोत.

रवि दुबे ने यांनी सांगितले कि डब्ल्यूडब्ल्यूई संडे धम्माल मध्ये मी कमेंटरी करत असल्यामुळे माझ्यासाठी एक खास अनुभव आहे, कारण डब्ल्यूडब्ल्यूई बरोबर एक वेगळे नातचं बनले आहे. मी नेहमीच टीव्ही पहात असायचो आणि डब्ल्यूडब्ल्यूई बघत असे, दुसरा चैनल बदलण्याचा कोणताच पर्याय नव्हता.

कुणाल रॉय कपूर म्हणाले कि आमचा चित्रपट 3 देव हा जून रोजी रिलीज होत आहे आणि डब्ल्यूडब्ल्यूई मध्ये प्रमोशनचा एक भाग बनने एक मजेदार अनुभव होता. केविन ओवेन्स आणि सेठ रोलिन्स यांच्या सोबत उच्च लेवलची ओक्टेन मैच साठी कमेंटरी करण्याचा करण आणि रवी यांना अतिशय रोमांचक अनुभव आहे. आर २ फिल्लम प्रोडक्शंस चे चिंतन राणा चित्रपटांचे निर्माता आहेत आणि इ ४ यू इंटरप्राइजेज चे अयूब ख़ान हा सिनेमा प्रेजेंट करत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अंकुश भट्ट यांनी केले आहे. हया चित्रपटात राइमा सेन, प्रिया बॅनर्जी, पूनम कौर, टिस्का चोप्रा आणि प्रोसेनजीत चॅटर्जी यांचाही समावेश आहे. चित्रपट जून रोजी रिलीज होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर