सलमान भाई माझ्या साठी लक्की आहेत : सिंगर शबाब साबरी


बॉलीवुड चे सुप्रसिद्ध प्ले सिंगर शबाब साबरी सध्या गाजत आहे, अनीस बज्मी चा चित्रपट वेलकम बैक मधील गाण नस नस में जबरदस्त हिट झाले आहे आणि ह्या वर्षीच त्यांचे चित्रपट "सिंह इज़ ब्लिंग" व "प्रेम रतन धन पायो" रिलीज़ होणार आहे, ह्यामध्ये त्यांची जबरदस्त गाणी आहेत. एक मुलाखत शबाब साबरी बरोबर ...


तुम्ही मूळचे कोठचे आहात आणि किती वयापासून ट्रेनिंग घ्यायला सुरुवात केली ?
शबाब : माझा जन्म ६ जुलै, १९७९ सहारनपुर मध्ये झाला. माझे वडिल इकबाल साबरी आणि काका अफजाल साबरी सुप्रसिद्ध कव्वाली आणि सूफी सिंगर्स आहेत. घरातच लहानपणापासून संगीताच्या सुरांचे वातावरण होते, परंतु मी वयाच्या १४ वर्षापासून उस्ताद रशीद खान साहेबांकडून विधिवत प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर मी पप्पा व काका बरोबर लाइव शोज मध्ये गाणी गाणे सुरु केले व तेथेच माझ्या पंखाना मजबूत बळ मिळाले व मी उत्तम गायक झालो.

बॉलीवुड मध्ये कोणत्या चित्रपटापासून सुरुवात झाली ?
शबाब : मी सलमान भाई चा चित्रपट "जब प्यार किया तो डरना क्या पासून सुरुवात केली, जो १९९८ मध्ये सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. साजिद-वाजिद चे संगीत होते आणि माझे पप्पा व काका बरोबर मी "तेरी जवानी बड़ी मस्त मस्त है" हे गाणे गायले होते. हा मुखडा गायल्यावर माझ्याकडे भरपूर चित्रपटांत गाणी गाण्याच्या ऑफर आल्या होत्या. त्यानंतर मी मागे वळून कधीच पाहिले नाही. माझ्यासाठी सलमान भाई लक्की आहेत, हे मी मनापासून मानतो.

आतापर्यंत तुम्ही किती गाणी गायली आहेत ?
शबाब : मी फारच आनंदी आहे कि मी आतापर्यंत शंभराहून अधिक गाणी गायली आहेत व त्यातील एक डझन हून अधिक गाणी सुपरहिट झाली आहेत. दबंग’, बोल बच्चन आणि एजेंट विनोद सारख्या चित्रपटांसाठी गायलेली गाणी लोकांना फार आवडली आहेत, त्यामुळेच माझा उत्साह वाढला. त्याच बरोबर मी तेज’, वीर’, डैंजरस इश्क’, पेज थ्री आणि पिक्चर अभी बाकी है मध्ये देखील गाणी गायली आहेत. 

तुमचे करियर बनविण्यात कोणाचा मोलाचा हातभार लागला आहे ?
शबाब : करियर च्या ह्या ऊंचीवर मी हिमेश रेशमिया मुळेच आहे, त्याचे आभार मानतो. त्यांनीच माझ्याकडून सर्व गाणी गाऊन घेतली व माझ्यावर विश्वास ठेवून मला संधी देत राहिले. साजिद-वाजिद व हिमेश रेशमिया बरोबर मी सर्वात जास्त काम केले आहे. मी स्व:ताला भाग्यशाली समजतो कि मी हया संगीतकारों बरोबर काम केले आहे. त्याचबरोबर मी माझे सुपरहिट करियर बनविण्यामध्ये हिमांशु झुनझुनवाला यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या सहयोगामुळेच मी ह्या मायानगरीत टिकून राहिलो.

तुमची स्व:ताची एक वेगळी ओळख आहे, ही एक विशिष्ट ओळख बनवुन ठेवणे फारच अवघड गोष्ट आहे ?
शबाब  : मी माझ्या गायकी मध्ये एका खास प्रकारचे वैरीएशन ठेवले आहे. मी एकीकडे सूफी गाणी गायली आहे तर दूसरीकडे ठुमरी देखील गायली आहे. गजल गायली तर रोमांटिक गाणी देखील गायली आहे. त्याचबरोबर क्लासिकल गाण्यांना देखील आवाज दिला आहे.


Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर