‘लाखों हैं यहां दिलवाले’ च्या प्रिमियर साठी चित्रपट इंडस्ट्री मधील काही मान्यवर अंधेरी स्थित फन रिपब्लिक सिनेमा मध्ये आले
मुन्नवर भगत, हे हिंदी चित्रपट ‘लाखों
हैं यहां दिलवाले’ चे निर्माता, दिग्दर्शक आणि लेखक आहेत, त्यांनी आपल्या पहिल्या चित्रपटाचा प्रिमियर अंधेरी स्थित फन रिपब्लिक
मध्ये ठेवला होता, त्यासाठी चित्रपटांतील सर्व कलाकार व पाहुण्यांना आमंत्रित केले
होते. वीजे भाटिया आणि कृतिका गायकवाड मुख्य कलाकार आहेत व ते सर्वात पहिले आले आणि
त्यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. अरुण बक्शी,
किशोरी शहाणे, अंजू महेंद्रू देखील प्रिमियर शो साठी आले. पाहुण्यांमध्ये दिपक
बलराज विज, गुरमीत चौधरी,
देबिना बैनर्जी, मिस्ट्री मुखर्जी व टीना घई चित्रपट पाहण्यासाठी आले. त्यानंतर
मुन्नवर भगत यांनी आपला वाढदिवस देखील साजरा केला. चित्रपटांत १९६० च्या दशकांतील एक
नाही तर अकरा सुपरहिट गाणी आहेत.
Comments