खासदार कपिल पाटिल च्या दही हंडी साठी चित्रपट व टीवी इंडस्ट्रीचे कलाकार भिवंडी मध्ये आले
खासदार
कपिल पाटिल मागील दहा वर्षापासून सोशल इवेंट चे आयोजन करत आले आहेत. ह्या वर्षी
भिवंडी स्थित शिवाजी चौक येथे भव्य आणि दिव्य दही हंडी चे आयोजन केले
होते व बक्षिसाची रक्कम ३३ लाख रुपए ठेवली होती. ह्या इवेंट मध्ये सर्वात पहिले
दिपक बलराज विज आणि किशोरी शहाणे आले. त्यानंतर गायिका शबाब साबरी, टीना घई, संचिति सकट आणि तारिका भाटिया ने दर्शकांना
भरपूर नाचविले. कलाकारां मध्ये जरीन खान, दिव्यांका त्रिपाठी, एकता जैन, परीक्षित साहनी,
अमृता खानविलकर सुद्धा आली होती. कृतिका गायकवाड आणि दिग्दर्शक मुन्नवर भगत यांनी
हिंदी चित्रपट ‘लाखों हैं यहां दिलवाले’ चे जोरदार प्रमोशन केले. ह्या चित्रपटात ११ जुनी सुपरहिट गाणी आहेत व
त्यामुळेच हा चित्रपट दर्शकांना फार आवडला आहे.
अभिनेत्री
किशोरी शहाणे ने सर्व भिवंडी वासियांचे जोरदार स्वागत केले. किशोरी म्हणाली कि दही
हंडी चा उत्सव म्हणजे खराखुरा मराठमोळा मस्तीचा व जल्लोषाचा सण आहे. लहान
मुलांपासून ते वयोवुद्ध देखील हा सण मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा करतात.
गायिका
शबाब साबरी, तारिका भाटिया, संचिति सकट व एकता जैन ने दही हंडी पाहण्यासाठी आलेल्या दर्शकांचे गाणी
गाऊन मनोरंजन केले. त्याचबरोबर अभिनेत्री जरीन खान,
दिव्यांका त्रिपाठी व अभिनेता परीक्षित साहनी ने देखील दही हंडी सणाचे महत्व व
मराठमोळ्या परंपरे बद्दल सांगितले व प्रेक्षकांचे जल्लोषाने स्वागत केले, त्यामुळेच रात्री १० वाजे पर्यंत दर्शकांची गर्दी वाढतच चालली होती.
‘आता
वाजले की १२’ फेम अभिनेत्री अमृता खानविलकर ने एकदम जल्लोषात
भिवंडी वासियांचे भरभरून स्वागत केले व एक जबरदस्त डांस नंबर सादर केला. दर्शकांना
अमृता चे नृत्य फारच आवडले व त्यांनी वन्स-मोरचा तडका देखील लावला होता.
नुकताच
प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट ‘लाखों हैं यहां दिलवाले’ चे दिग्दर्शक मुन्नवर भगत
सोबत अभिनेत्री कृतिका गायकवाड ने दही हंडी च्या उत्सवात येऊन आपल्या चित्रपटाचे
जोरदार प्रमोशन केले व कृतिका ने आपल्या नृत्यांचा जलवा देखील दाखविला.

Comments