मुख्यमंत्री फडणवीस यांना अंतरराष्ट्रीय पावर लिफ्टर गौरव शर्मा भेटले
पावर लिफ्टिंग मध्ये देशाचे नाव उज्जवल करणारा पावर लिफ्टर पंडित गौरव शर्मा ने आपल्या मुंबई प्रवासामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. पुढच्या महिन्यात अमेरिका स्थित लास बेगास मध्ये होणा-या ओलंपियाड मध्ये भाग घेणा-या गौरव शर्मा यांस मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या. गौरव शर्मा सोबत प्रसिद्ध निर्माता वासु भगनानी चे भाऊ खेमचंद भगनानी देखील होते. त्याचबरोबर दिल्ली स्थित चांदनी चौक येथील प्राचीन नरसिंह हनुमान मंदिराचे पंडित गौरव शर्मा ने नुकतेच जर्मनी मध्ये झालेल्या यूरोपियन पॉवरलिफ्टिंग चैंपियनशिप मध्ये दोन स्वर्ण पदक प्राप्त केले आहेत. ह्या चैंपियनशिप मध्ये त्यांनी 242 किलो वजन उचलून विश्व रिकॉर्ड देखील बनविला आहे. आता ते सप्टेंबर महिन्यात अमेरिका स्थित लॉस वेगास मध्ये होणा-या ओलंपियाड साठी पावर लिफ्टिंगची तयारी करण्यात व्यस्त आहे. गौरव शर्मा ने कॉमनवेल्थ, एशिया व वर्ल्ड यूरोपियन सहित अन्य अंतरराष्ट्रीय प्रतिस्पर्धेत 12 हून अधिक पदक प्राप्त केले आहे, त्यातील आठ स्वर्ण पदक आहेत. गौरवला संकटाबरोबर झुंज देऊन त्याला असाधारण बनविते. वर्ष २०११ मध्ये एका रोड दुर्घटनेत त्याच पायाला दुखापत झाली होती, ज्या पायाला लहानपणी पडल्यावर जखम झाली होती. त्याच पायाचे ऑपरेशन झाले होते. एवढं सारी काही घडलं तरी गौरव चे पॉवरलिफ्टरचा स्वर्णिम प्रवास सुरु आहे. यापूर्वी त्यांनी वर्ष 2007 मध्ये न्यूजीलैंड येथे आयोजित कॉमनवेल्थ चैंपियनशिप मध्ये चार गोल्ड पदक जिंकली आहेत.
Comments