समय नेशनल डिजिटलच्या दुस-या वर्धमान दिनानिमित्त आयोजित "समाजरत्नपुरस्कार" समारंभात काही वरिष्ठ मान्यवरांना सम्मानित केले.



समय नेशनल डिजिटल न्यूजच्या दूस-या वर्धमान दिनानिमित्त आयोजित समाजरत्न पुरस्कार समारंभात काही वरिष्ठ राजनितिक, सामाजिक मान्यवरां सोबत फिल्मी कलावंतानी आपली उपस्थिति लावली होती. फक्त महाराष्ट्र नाही तर उत्तर प्रदेश, गुजरात, दिल्ली मधील वरिष्ठ लोकांनी ह्या कार्यक्रमाला हाजिरी लावली. गोरेगांव पूर्व स्थित वेस्टिन होटल मध्ये आयोजित ह्या भव्य समारंभाची सुरुवात दीपप्रज्वलन व गणेश वंदना करुन झाली. दीप प्रज्वलन महाराष्ट्र चे कैबिनेट मंत्री महादेव जानकर, आमदार मनीषा चौधरी, मुंबई मित्र/वृत्त मित्र चे समूह संपादक अभिजीत राणे, समय नेशनल चे मुख्य संपादक अरुण कुमार गुप्ता, उत्तरराज्य नवनिर्माण सेना चे अध्यक्ष अमित जानी, सीने कलाकार मनीष वाधवा एवं अन्य उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आलेल्या खास पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले व त्यानंतर समय नेशनलच्या दूस-या वर्धापन दिनानिमित्त चैनलच्या प्रगतीबद्दल सर्व उपस्थित पाहुण्यांनी आप-आपले मनोगत व्यक्त केले. समय नेशनल ने यशस्वीरित्या २ वर्ष पूर्ण केल्याबद्दल सर्व मान्यकरांनी चैनल चे मुख्य संपादक अरुण कुमार गुप्ता व इतर सदस्यांना शुभेच्छा दिल्या.

ह्या वर्षी पहिल्या वेळी समय नेशनल द्वारा "समाजरत्न पुरस्कार २०१८"  चे आयोजन केले गेले. समाजातील अशा लोकांची निवड सन्मानित करण्यासाठी केली गेली, ज्यांनी समाजाला नवी दिशा देण्यासाठी आपले महत्वपूर्ण योगदान दिले आहे. ह्या पुरस्कार समारंभात कैबिनेट मंत्री, खासदार, सरकारी अधिकारी, आमदार, नगरसेवक, डॉक्टर्स, शिक्षण संस्थान चे ट्रस्टी, उद्योगपति, वरिष्ठ पत्रकार, सीने कलाकार, फ़िल्म इंडस्ट्री, सामाजिक क्षेत्राशी संलग्न विभिन्न संस्थाना "समाजरत्न पुरस्कार" ने सन्मानित केले गेले. पंच सितारा होटेलच्या सुसज्जित पटागणात आयोजित "समाजरत्न पुरस्कार" मध्ये आलेला प्रत्येक व्यक्ति आपल्याला अभिमनाची बाब म्हणून मानत होता. ह्या समारंभात इनकम टैक्स डिपार्टमेंट चे जॉइंट कमिश्नर अखिलेन्द्र प्रताप यादव ने डिजिटल मीडिया बद्दल काही मुख्य मुद्दयांवर चर्चा केली.

कैबिनेट मंत्री महादेव जानकर ने आपल्या मनोगतात म्हटले कि पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या संघर्षानंतर एक उचित पद प्राप्त होते आणि त्यानंतर भरपूर सामाजिक जवाबदा-या वाढतात. एका साप्ताहिक वर्तमानपत्राची सुरुवात करुन ज्याप्रकारे चैनल चे संपादक अरुण कुमार ने हे काही मिळविले आहे ते प्रशंसनिय आहे. मुंबई मित्र एवं वृत्त मित्र चे समूह संपादक अभिजीत राणे ने म्हणाले कि एक सरळ, उच्च विचार व योग्य दिशेने आपल्या कैरियर ची सुरुवात करणा-या ह्या युवा पत्रकार ने फारच कमी काळात योग्य स्थान अर्जित केले आहे. मागील एका दशकामध्ये अरुण गुप्ताचा पूर्ण संघर्ष फारच जवळून पाहिला आहे आणि कोणताही विषय असो वा चर्चा किवां मार्गदर्शनाची बाब असेल तेव्हा मी सहकार्य करत आलो आहे आणि पुढे देखील करत राहील. कार्यक्रमाच्या मध्ये पोहचलेले खासदार गोपाल शेट्टी और खासदार गजानन कीर्तिकर म्हणाले कि ह्या मीडियात ज्या प्रकारे काही लोक फक्त एका व्यक्तिला विशेष महत्व देऊन बातम्याचे आदान-प्रदान केले जाते, अशा मध्ये झोपडपट्टी व गरीब लोकांच्या समस्यां घेऊन आपल्या चैनलच्या माध्यमातून वेळो-वेळी शासन व प्रशासनापर्यंत पोहचविण्याचे काम अरुण कुमार गुप्ता ने केले आहे, हे कार्य फारच प्रशंसनिय आहे, हे मनोगत व्यक्त करुन चैनलच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. आमदार मनीषा चौधरी आणि आमदार विद्या चव्हाण ने चैनलच्या प्रगतीबद्दल प्रशंसा केली व नेहमीच अशा प्रकारे यापुढे देखील सहयोग करण्याचा वादा केला. कार्यक्रमात पाहुण्याच्या रुपात राधे मां ला समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले. त्या म्हणाल्या कि डिजिटल युगात ह्या युवकांने जे कार्य केले आहे ते फारच प्रशंसनिय आहे व माझा आशीर्वाद नेहमीच त्याच्याबरोबर राहील. उत्तरराज्य नवनिर्माण सेना चे अध्यक्ष अमित जानी म्हणाले कि ज्याप्रकारे अरुण कुमार व त्यांच्या टीम ने जलद गतीने प्रगती केली आहे अशा मध्ये हा चैनल लवकरच मोठ्या ऊंचीवर पोहचेल.

ह्या कार्यक्रमात मुख्य पाहुणे म्हणून कैबिनेट मंत्री महादेव जानकर, खासदार गोपाल शेट्टी, सांसद गजानन कीर्तिकर, आमदार मनीषा चौधरी, आमदार विद्या चव्हाण, इनकम टैक्स डिपार्टमेंट चे जॉइंट कमिश्नर अखिलेन्द्र प्रताप यादव, आध्यत्मिक गुरु राधे माँ, मुंबई मित्र/वृत्त मित्र अखबार चे समूह संपादक अभिजीत राणे, उत्तरराज्य नवनिर्माण सेना चे अध्यक्ष अमित जानी, हिन्दू नेता उपदेश राणा, स्थानीय संपादक कमलेश वैष्णव, शोधक पत्रकार विवेक अग्रवाल, वरिष्ठ पत्रकार सतीश सोनी, प्रमुख मार्गदर्शक योगेश पटेल, डॉ शशिभूषण शर्मा, डॉ प्रणव काबरा, डॉ योगेश कोडकानी, डॉ अजीत जैन, आईपीआई(A) चे उपाध्यक्ष पोपटसेठ घनवट, फ़िल्म स्टूडियो सेटिंग एंड अलइड मजदूर यूनियन चे महासचिव गंगेश्वरलाल श्रीवास्तव, मुबु चैनल चे डायरेक्टर मनीष श्रीवास्तव, उद्योगपति विकास सिंग, उद्योगपति किशोर मानियाल, मनसे महिला महासचिव रीता गुप्ता, गुजरात प्रदेश सचिव प्रोटोकॉल नागेश मिश्रा, नगरसेवक राजपति यादव, नगरसेवक जितेंद्र पटेल, युवा नेता वैभव भरडकर, फ़िल्म अभिनेता मनीष वधवा, कॉमेडियन सुनील पाल, अभिनेत्री निशा दुबे, मंजरी मिश्रा, एकता जैन, अपेक्षा, हिमांशु झुनझुनवाला सोबत काही सुप्रसिद्ध मान्यवरांनी हा समारंभ यशस्वी बनविला.

कार्यक्रमाचे यशस्वी मंच संचालन एडवोकेट देवाशीष मर्क आणि पूजा महाजन ने केले. ह्या सुप्रसिध्द मान्यवरांच्या सोबत समय नेशनल चे कार्यकारी संपादक राधेश्याम गुप्ता, युवा पत्रकार संघ चे अध्यक्ष महेश गुप्ता, गुजरात प्रदेश प्रमुख लल्लन बिंद, विनय महाजन, अनिकेत भंकाल, भावना जैन, राजेश मंजाल, शिवशंकर तिवारी, यश जोशी, अर्पिता गुप्ता, प्रेम निषाद, रीता पटेल, लालमणि यादव, सुनील मौर्या, राघवेंद्र यादव सहित शंभरहून अधिक लोकांनी उपस्थिति लावली होती.
--

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

LESBIAN SHOOT, A CONCEPT BY SHAAN PHOTOGRAPHY WITH MODEL/ACTRESS YASMEEN KHAN AND NATHASSHA SIKKA